बॉलीवूडमध्ये नव्वदचे दशक गाजवणारी सिनेअभिनेत्री आणि निर्माती जूही चावला हिचा जन्म १३ नोव्हेंबर १९६७ रोजी झाला.
जूही चावला १९८४ सालची मिस इंडिया विजेती आहे. बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय व्यक्तींमध्ये तिची गणना होते. मिस इंडिया स्पर्धा जिंकल्यानंतर जुहीने अभिनयामध्ये उतरायचे ठरवले. १९८६ सालच्या सल्तनत ह्या चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर १९८८ साली आलेला आमिर खानसोबतचा कयामत से कयामत तक हा तिचा दुसरा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला व जुही रातोरात सुपरस्टार बनली. तेव्हापासून तिने अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत व तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
हिंदी खेरीज जुहीने तेलुगू, तमिळ इत्यादी भाषांमधील चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे. अभिनयाखेरीज जुही चित्रपट निर्मितीमध्ये देखील कार्यरत आहे खळाळतं हास्य, चेहऱ्यावर एक हट के नटखटपणा आणि अभिनयातली जबरदस्त अदा. या गोष्टींमुळं या अभिनेत्रीनं एक काळ बॉलिवूडवर अक्षरश: राज्य केलं. जुही चावला ही बॉलीवूडची चुलीबुली अभिनेत्री म्हणुन सुध्दा ओळखली जाते.
बॉ़लीवूडमध्ये जूही चावला आणि शाहरुख खान यांची मैत्री नावाजली जाते. दोघही खूप चांगले मित्र-मैत्रिण आहेत. आमीर- जूही चावलाच्या जोडीने काही सुंदर चित्रपट दिले आहेत. जूही-शाहरुखची जोडी चित्रपटसृष्टीतील एक हीट जोडी राहिली आहे. या दोघांनी राजू बन गया जेन्टलमॅन, डर, डुप्लीकेट, यस बॉस यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ‘गुलाब गँग’ या सिनेमातल्या तिच्या खलनायकी भूमिकेचंही कौतुक झालं.
जुही चावलाने हॉलीवूडमध्ये काम केले आहे. द हंड्रेड फूट जर्नी या चित्रपटातून जुहीने काम केले आहे.
जय मेहता या गुजराती उद्योगपतीशी तिने १९९८ मध्ये विवाह केला. “आयपीएल‘मधल्या कोलकता नाईट रायडर्स टीमची सहमालकी त्यांच्याकडे आहे.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply