नमस्ते लंडन, एक था टायगर, अजब प्रेम की गजब कहानी, जब तक है जान, धूम ३, ‘एक था टायगर’ असे एकाहून एक सरस व हिट चित्रपट देणारी व बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असणारी सुपरस्टार म्हणजे कतरिना कैफ. कतरिना लहान असतानाच तिच्या आई-वडीलांचा घटस्फोट झाला. तिची आई सामाजिक कार्यकर्ती असल्याने कैफ परिवाला दर दोन वर्षांनी आपला बाडबिस्तरा उचलून नवनव्या ठिकाणी, देशांत प्रवास करावा लागत असे. कतरिना लहानपणापासूनच मॉडेलिंगच्या क्षेत्रात आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ रोजी झाला.२००३ साली कतरिना भारतात आली. तिचा पहिला चित्रपट ‘बूम’ दणकून आपटला, मात्र या अपयशाने खचून न जाता अथक मेहनत करत तिने बॉलिवूडमध्ये बस्तान बसवले. ‘मैने प्यार क्यूं किया’ या चित्रपटात ती प्रथमच सलमानसोबत मुख्य भूमिकेत झळकली. मात्र २००७ साली आलेल्या ‘नमस्ते लंडन’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर यशस्वी ठरला आणि कतरिनाने प्रथमच यशाची चव चाखली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचेही खूप कौतुक झाले. या चित्रपटापासून तिची व अक्षय कुमारची जोडी हिट ठरली. ती दिवसातील १६-१६ तास काम करत असते. न थकता, न कंटाता काम करण्याच्या आपल्या सवयीमुळे आज आपल्याला हे यश, प्रसिद्धी मिळत असल्याचे कतरिनाचे म्हणणे आहे. शीला की जवानी, चिकिनी चमेली ही आयटम साँग खूप गाजली आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. विकीपीडीया
Leave a Reply