बोल्ड अभिनेत्री म्हणून नीना गुप्ता यांची ओळख आहे. त्यांचा जन्म ४ जुलै १९५९ रोजी झाला.
यें नजदीकिया, मंडी, उत्सयव, डॅडी, तेरे संग आणि’ दिल से दिया वचन या चित्रपटासह काही सीरियल्स मध्ये नीना गुप्ता यांनी काम केले आहे.
विवियन रिचर्ड्स जेव्हा १९८० साली भारतात दौ-यावर आले होते तेव्हा त्यांची एका कार्यक्रमात अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या सोबत झाली. पहिल्या भेटीतच ते एकमेंकाच्या प्रेमात पडले. नीना रिचडर्सच्या प्रेमात आकंड बुडाल्या. रिचडर्स यांचे लग्न झाले असतानाही नीना यांनी त्यांच्यासोबत संबंध ठेवला. त्यातून नीना आणि रिचडर्स यांना एक मुलगी झाली. आता ती मुलगी ३० वर्षाची असून तिचे नाव मसाबा ठेवण्यात आले आहे. सध्या ती मॉडेलिंगमध्ये करिअर बनवित आहे. विवियन रिचर्ड्स यांची भारतीय मुलगी आपली आई नीना गुप्ताला रोल मॉडेल मानते. मसाबा आज एक यशस्वी फॅशन डिझायनर आहे. मोठे-मोठे फॅशन शोमध्ये तिने डिझाइन केलेल्या कपड्याचे प्रदर्शन लागते. मसाबा विल्स लायफस्टाईलचे कित्येक अवार्ड्स जिंकली आहे.
२००८ मध्ये नीना यांनी विवेक मेहरा सोबत लग्न केले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply