यादो की बारात’ चित्रपटातून सगळयांच्या मनात घर करून बसणारी अभिनेत्री नीतू सिंह या एक बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जायच्या. हिंदी चित्रपटसृष्टीत नीतू सिंह यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
नीतू यांच्या आणखी दोन ओळखी आहेत. एक म्हणजे ॠषी कपूरची पत्नी म्हणून दुसरी ओळख म्हणजे रॉकस्टार रणबीर कपूरची आई.
नितू सिंह यांचा जन्म ८ जुलै १९५८ रोजी झाला. नितू सिंहने ६० च्या दशकात हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये बेबी सोनिया या नावाने बालकार म्हणून आपल्या अभिनयाला सुरूवात केली होती. १९७२ मध्ये ‘रिक्शावाला ’या चित्रपटापासून करिअरला सुरूवात केली. ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांनी ‘जहरीला इंसान’ या सिनेमात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. ‘खेल खेल में’ या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान हे दोघे प्रेमात पडले. १९८० मध्ये त्यांनी ॠषी कपूर सोबत लग्न केले होते.
लग्नानंतर नीतू सिंग यांनी अभिनय करणे बंद केले होते. त्याकाळी नीतू सिंग आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होत्या.
रफू चक्कर, दूसरा आदमी, कभी कभी, अमर अकबर एन्थनी, यादोकी बारात,खेल खेल मे असे लक्षात राहण्यासारखे असे चित्रपट नितू सिंह यांनी दिले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply