बॉलीवुड चे दिग्गज गिटार वादक गोरख शर्मा यांचा जन्म २८ डिसेंबर १९४६ रोजी झाला. गोरख रामप्रसाद शर्मा हे संगीतकार प्यारेलाल यांचे धाकटे बंधू होते. गोरख शर्मा यांनी आपल्या वयाच्या १२ व्या वर्षापासून मेन्डोलिन वाजवण्यास सुरवात केली. सुरवातीच्या काळात ते हृदयनाथ मंगेशकर यांच्या कार्यक्रमात मेन्डोलिन वाजवत असत.
वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी संगीतकार रवी यांच्या चौदवीका चांद या गाण्याला मेन्डोलिन वाजविले होते. जागतिक कीर्तीचे गोरख शर्मा यांनी अनेक अविस्मरणीय गाण्यांना गिटार वादन केले ते ‘लक्ष्मीकांत-प्यारेलाल’ यांचे मुख्य सहाय्यक होते. त्यांनी आपल्या १९६० ते २००२ मधील करीयर मध्ये १००० हून अधीक गाण्यांना गिटार वादन केले व ५०० हून अधीक चित्रपटात गिटार व इतर तार वाद्य वाजवली होती.
‘कर्ज़’ या चित्रपटातील ‘एक हसीना थी, एक दीवाना था’ च्या गाण्याचा गिटार गोरख शर्मा यांचा होता. आशिकी या चित्रपटातील गिटारचा पिस पण गोरख शर्मा यांचाच होता. गोरख शर्मा यांचे २७ जानेवारी २०१८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३