दिग्दर्शक व पटकथाकार चेतन आनंद यांचा जन्म ३ जानेवारी १९२१ रोजी झाला.
देव आनंद आणि त्यांचे बंधू यांनी अनेक संस्मरणीय चित्रपट निर्माण करून ठेवले आहेत. चेतन आनंद हे देव आनंद आणि विजय आनंद यांचे बंधू.
चेतन आनंद दिग्दर्शित हिमालय फिल्म्सचा ‘हकिकत’ (१९६४) हा आपल्याकडचा सर्वोत्तम युद्धपट मानला जातो. १९६२ साली झालेल्या भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर चेतन आनंद यांनी ‘हकिकत’ घडवला आणि रसिकांना प्रचंड भावला देखील.
युद्धपट म्हणजे फक्त युद्धाचे थरारक प्रसंग नव्हे तर त्यासह भावनिकता, नातेसंबंध व उत्कट गीत-संगीत हेदेखील हवे. या स्वरूपाचे भान चेतन आनंद यांनी ठेवले म्हणूनच तर हा चित्रपट खूपच प्रभावी ठरला.
चेतन आनंद यांचे ६ जुलै १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply