नवीन लेखन...

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोणचा जन्म ५ जानेवारी १९८६ रोजी डेन्मार्कच्या कोपेनहेगन येथे झाला. बंगळूरच्या सोफिया हायस्कूलमधून शालेय शिक्षण आणि माऊंट कार्मल कॉलेजमधून दीपिकाने प्री-यूनिव्हर्सिटी एज्युकेशन पूर्ण केले.त्यानंतर दीपिकाने बीए करण्याच्या उद्देशाने इंदिरा गांधी नॅशनल ओपन यूनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. मात्र शिक्षण अर्ध्यावर सोडून ती मॉडेलिंग क्षेत्राकडे वळली. खरं तर वयाच्या ८ व्या वर्षीच दीपिकाने अनेक जाहिरातींमध्ये काम केले होते. कॉलेजच्या दिवसांमध्येच तिने रॅम्प वॉक केला होता.लिरिल, डाबर दंत मंजन, क्लोज-अप, लिम्का अशा ब्रँड्सची ती अॅम्बेसेडर होती.

दीपिकाने बॉलिवूडमध्ये ‘ओम शांती ओम’ सिनेमामधून पदार्पण केले. हा सिनेमा २००७ मध्ये रिलीज झाला होता. तिला पहिल्याच सिनेमात बॉलिवूड किंग खानसोबत काम करायची संधी मिळाली. हा सिनेमा हिट झाला आणि त्यानंतर दीपिकाच्या अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धूम घातली. दीपिकाने अनुपम खेर यांच्या अॅतक्टिंग इंस्टिट्यूटमध्ये अभिनयाचे धडे गिरवले आणि शामक डावर यांच्याकडून डान्स शिकली. दीपिकाचा ‘ऐश्वर्या’ हा कन्नड भाषेतील पहिला सिनेमा होता. आज ती आज बॉलिवूडमधील एक प्रसिध्द अभिनेत्री असून २००६ मध्ये ‘फिमेल मॉडल ऑफ द इयर’ आणि ‘फ्रेश फेस ऑफ द इयर’चा मान पटकावला.

‘ये जवानी है दिवानी’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, आणि ‘गोलियों की रासलीला-रामलीला’, हॅपी न्यू ‘इयर’, ये जवानी है दिवानी, पिकू, रामलीला, बाजीराव मस्तानी हे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारी दीपिका. हे तिचे हिट ठरलेले सिनेमे. दीपिका प्रसिध्द बॅटमिंटन खेळाडू प्रकाश पदुकोण यांची मुलगी आहे आणि तिची आई उज्वला एक ट्रॅवल एजंट आहेत. दीपिकासुध्दा एक बॅटमिंटन खेळाडू आहे. ती राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर बॅटमिंटन आणि बेसबॉस खेळली आहे. बंगळूरु येथून शालेय शिक्षण आणि माउंट कॅरमल महाविद्यालयातून पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. जेव्हा ती पदवीचे शिक्षण घेत होती तेव्हा तिला मॉडलिंगची ऑफर आली होती. तिने मॉडलिंग एक छंद म्हणून केली, परंतु नंतर तिने या छंदाला गांभीर्याने घेतले आणि अनेक जाहीरातीत ती झळकली. म्हटले जाते, की दीपिकाला अभिनेत्री होण्याची इच्छा नव्हती. तिच्या म्हणण्यानुसार फिल्म इंटस्ट्रीमध्ये येण्याचा तिने कधीच विचार केला नव्हता. परंतु आज ती यशस्वी अभिनेत्रींमध्ये सामील आहे. सांगायचे झाले तर, तिचे नाव अनेक लोकांसोबत जोडण्यात आले होते. पण दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे दोघे आज म्हणजेच ५ जानेवारी रोजी साखरपुडा करणार आहेत. विशेष म्हणजे दीपिकाने साखरपुड्यासाठी स्वतःच्या वाढदिवसाचा मुहूर्त निवडला आहे. राम-लीला’ या चित्रपटातून रणवीर-दीपिका पहिल्यांदा ऑनस्क्रीन झळकले होते.

त्यानंतर दोघांचं अफेअर असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगली. ‘बाजीराव-मस्तानी’या चित्रपटानंतर जणू त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झालं. काही दिवसांपूर्वी फिल्मफेअरच्या पार्टीत दीपिकाने रणवीरचा ‘बॉयफ्रेण्ड’ असा उल्लेख केला होता. इतकेच नाही तर रणवीर दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण यांच्यासोबतही अनेकदा दिसला आहे. ‘पद्मावती’या बहुचर्चित व बहुप्रतिक्षित चित्रपटात हे दोघे दिसणार आहेत. या चित्रपटात रणवीर सिंग अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत आहे तर दीपिका पदुकोण राणी पद्मावतीची भूमिका साकारत आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..