नवीन लेखन...

बॉलिवूडचे संगीतकार मदनमोहन

मदनमोहन यांचे वडील रायबहादूर चुनीलाल कोहली व आई भगवंती जेव्हा इराक येथे होते तेथे या संगीतकाराचा २५ जून १९२४ रोजी जन्म झाला. मधुरता व भाव-भावना॑चा उत्कृष्ट परिपोष मदनमोहन यांच्या संगीतात प्रकर्षाने जाणवतो. गझल, ठुमरी हे तर त्याचे हक्काचे किल्लेच होते. मदनमोहन यांचे हिंदी, उर्दूवर त्यांचे उत्तम प्रभूत्व होते.

भिन्न प्रकृतीची गाणी अगदी लीलया देणं हा मदनमोहन यांचा स्वभाव होता. एका सिनेमातच नव्हेतर एकाच गाण्याच्या प्रत्येक कडव्यात ते कित्येकदा वेगवेगळ्या रागदारीचे, वेगवेगळ्या मूडचे प्रयोग करीत असत. इक हसीन शाम को (दुल्हन एक रातकी), बेताब दिल की तमन्ना (हसते जख्म), कोईपत्थर से ना मारे (लैला-मजनू) अशी अनेक गाणीदाखला म्हणून देता येतील. ‘हसते जख्म’मधील ‘तुमजो मिल गये हो’ या गाण्यात स्क्रिप्टच्या मागणीनुसारप्रत्येक कडव्यात एवढे वेगवेगळे मूड्स वापरले होतेकी, ते त्या काळात मदनमोहन यांच्या दर्दी चाहत्यांनासुद्धा फारसे आवडले नव्हते, पण आजही त्यांची लोकप्रियता एवढी टिकून आहे की, जेव्हा अलीकडे कोकाकोलाच्या अॅडमध्ये वापरल्या गेलं तेव्हा तरुणपिढीला त्यांच्यात आजच्या युगाचीच झिग आढळली.

चित्रपटातला गाण्याचा कोणताच प्रकार मदनमोहन म्हणून यांनी वर्ज्य मानला नाही. मदनमोहन यांच्या गाण्याचे मुखडे कायम गुणगुणत राहावे, असे होते. उत्स्फूर्त वाटणार्या् संगीतात वाक्यासाठी चालीत मुबलक जागा सोडलेल्या असत. त्यामुळे त्यांच्या गाण्यात ‘गायकी’ अंग फार ठळकपणे दिसून येत असे. कारकीर्दीच्या सुरुवातीला ‘हमारे बाद अब महफ़िल में’, किंवा ‘दुखियारे नैना’सारखी विलक्षण ताकदीची गाणी देणारे मदनमोहन, अगदी आयुष्याच्या अखेरीस ‘बैया ना धरो’ किंवा ‘आज सोचा तो आंसू भर आये’ अशी त्याच तोलामोलाची गाणी देऊ शकले.

मदनमोहन यांच्या बरोबर राजेन्द्रकृष्ण, राजा मेहन्दी अली खान, साहिर लुधियानवी, नक्ष लायलपुरी, मजरूह सुलतानपुरी तसेच कैफी आझमीसारख्या अनेक थोर गीतकारानी महत्वपूर्ण योगदान दिलेले होते. मदन मोहन यांची घायाळ करणारी धून व उपरोक्त गीतकाराचे हृदयावर वार करणारे शब्द असा तो अजोड संगम होता. प्रभाकर जोग, उत्तम सिंग ह्यासारखे अव्वल दर्जाचे व्हायोलिन वादक तर मनोहारी सिंग सारखे उत्कृष्ट सॅक्सोफोन वादक यांच्याशिवाय मदनमोहन यांचे पान हलत नसे.

रस्मे उल्फत को निभाये तो निभाये कैसे ‘ ……
‘आपकी नज़रों ने समझा प्यार के काबिल मुझे …’

या अश्या बहारदार गीतांना स्वतःचा संगीतमय स्पर्श करून मदन मोहन यांनी ती गाणी अमर केली. या गाण्याचे संगीत म्हणजे संमोहनच जणू …. एक दोन नाही अनेक सदाबहार गीते देऊन करून आजही ते नेहेमीसाठी संगीत रूपाने वावरत असतात….

‘तू जहा जहा चलेगा मेरा साया साथ होगा’ असू दे नाहीतर ‘लग जा गले’ …. ‘नैनों में बदरा छाये’ …. ‘अगर मुझसे मोहोब्बत है’ … ‘यूँ हसरतों के दाग’ किंवा मग स्वतःच्या तालावर आपल्यालाही ठुमकायला लावणारे ‘झुमका गिरा रे ‘ असू दे ‘मदनमोहन’ या सर्व गीतांमधून संगीतमय दुनियेत व आपल्यात आजही भिनलेले आहेत.

मदनमोहन व किशोरकुमार यांची खास दोस्ती होती. मदनमोहन यांच्यासाठी अनेक हिट गाणी किशोरकुमार यांनी गायली होती. देव आनंद यांच्या ‘साहिब बहादूर’साठी किशोरकुमारच्या आवाजात खास देव आनंद स्टाईल गाणं मदनमोहन यांना रेकॉर्ड करायचं होतं. ‘राही था मै आवारा’ हे ते गाणं. किशोरकुमारला मात्र व्यस्ततेमुळे रिहर्सलसाठी वेळ मिळेना. अनेक दिवस वाट पाहून मदनमोहन यांनी गाणं स्वत:च्या आवाजात रेकॉर्ड करून टेप किशोरकुमार यांच्याकडे पाठवून दिली. किशोर कुमार यांच्या व्यस्ततेमुळे चिडलेल्या मदनमोहन यांनी गाण्याच्या शेवटी एक छोटासा संदेशही रेकॉर्ड केला, ‘ए बंगाली, मेरा गाना ध्यान से सुन, और अच्छेसे रिहर्सल करके आना, और खराब नही करना.’ मध्ये बराच काळ उलटला. किशोरकुमारच्या सोयीनुसार रेकॉर्डिंग ठरलं. रिहर्सलसाठी किशोर कुमार यांनी ही टेप ऐकली आणि शेवटी असलेला संदेश ऐकून त्यांचे डोळे पाण्याने भरून आले, कारण पंधरा दिवसांपूर्वीच मदनमोहन यांचा अकाली मृत्यू झाला होता.

मदनमोहन यांचे १४ जुलै १९७५ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट / अनिल गोविलकर/ अजय गंपवार

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..