पाकिस्तानातील सरगोधा येथे जन्म झालेले जगदीश राज फाळणीनंतर भारतात स्थायिक झाले. जगदीश राज खुराणा हे जगदीश राज यांचे पूर्ण नाव. जगदीश राज यांनी दीडशेहून अधिक चित्रपटात विविध भूमिका केल्या मात्र ते ‘पोलीस’ अधिकाऱ्याच्या भूमिकेत विशेष गाजले.
तब्बल १४४ चित्रपटांमधून त्यांनी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका वठविली होती. सिनेक्षेत्रातील २१ वर्षांच्या कारकिर्दीत एकाच प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारण्याचा विक्रम जगदीश राज यांच्या नावावर आहे. त्यांच्या या भूमिकांची ‘गिनिज् बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येही नोंद घेण्यात आली होती. बहुतांश हिंदी चित्रपटातून त्यांनी रंगविलेली ‘पोलीस अधिकारी’ ही भूमिका गाजली. ‘मजदूर’, ‘इनाम धरम’, ‘गोपीचंद जासूस’, सिलसिला’, ‘बेशरम’, तुम्हारी कसम’, सुहाग’, ‘ड्रीम गर्ल’, ‘गुलामी’, ‘असली नकली’, ‘विरोधी’, ‘चार दिन की चांदनी’ आदी चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. जगदीश राज हे अभिनेत्री अनीता राज यांचे वडील.
जगदीश राज यांचे २८ जुलै २०१३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply