बॉलिवूडमध्ये दिग्गज तारकांना घेऊन चित्रपट बनविणाऱ्या दिग्दर्शकांची कमी नाही. दिग्दर्शक प्रकाश झा यांनी शबाना आजमी आणि दीप्ती नवल पासून या काळातील काजोल, माधुरी दीक्षित, करिना कपूर, बिपाशा बसू, दीपिका पदुकोण, कॅटरिना कैफ आणि प्रियंका चोपडा अश सर्व स्टार नायिकांसोबत चित्रपट बनविले आहेत.
दिग्दर्शक म्हणून प्रकाश झा यांचा पहिला चित्रपट ‘दामुल’ होता. यात दीप्ती नवलने मुख्य भूमिका साकारली होती. शबाना आजमी यांनी त्यांच्या ‘मृत्युदंड’ मध्ये काम केले होते. या चित्रपटात माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाला माधुरीच्या सर्वश्रेष्ठ चित्रपटाच्या यादीत ठेवले जाते.
कमर्शियल चित्रपटाच्या दिग्गज नायिकांसोबत काम करणारे प्रकाश झा यांनी आपल्या चित्रपटांपासून आर्ट फिल्म मेकरची प्रतिमा तोडण्यात यश मिळविले. ‘दामुल’मुळे त्यांची तशी ओळख बनली होती. या प्रतिमेला तोडण्यात प्रकाश झा यांना अजय देवगण सोबतच्या ‘दिल क्या करे’ने मोठे योगदान दिले. चित्रपट बॉक्स ऑफीस वर जास्त चालला नव्हता, मात्र प्रकाश झा यांचे नाते या चित्रपटामुळे कमर्शियल चित्रपटासोबत जोडले गेले. अजय देवगण सोबत त्यांनी या चित्रपटानंतर ‘गंगाजल’ आणि ‘अपहरण’मध्येही काम केले. अपहरणमध्ये बिपाशा बसू होती. जिने बिहारी मुलीचा रोल केला होता. बिपाशा नंतर ‘राजनीति’ मध्ये प्रकाश झा ने कॅटरिना कैफ, ‘आरक्षण’ मध्ये दीपिका पदुकोण आणि ‘सत्याग्रह’मध्ये करिना कपूर सोबत काम केले.
प्रकाश झा यांचे गेल्या काही वर्षांतले चित्रपट म्हणजे भारतीय समाजाचे जळजळीत, धगधगीत वास्तवाचे चित्रण करणारे चित्रपट आहेत. अनेक चित्रपटात एकसंध पटकथा, कथानकातील नाटय़ टिकवून प्रेक्षकाला खिळवून ठेवण्यात ते यशस्वी झाले आहेत.
प्रकाश झा यांचे चित्रपट समकालीन प्रश्नांवर असतात. “दामुल’, “गंगाजल’, “अपहरण’, “राजनीती’ या चित्रपटांनी झा यांचे हिंदी चित्रपट क्षेत्रातील स्थान पक्के केलेले आहे. अमिताभ बच्चन यांच्यापासून अजय देवगण, अर्जुन रामपाल यांच्यासारख्या कलाकारांकडून आपल्याला हवा तो विषय काढून घेण्याची ताकद असलेल्या प्रकाश झा यांच्यासारख्या मुरब्बी दिग्दर्शकाला अभिनय करणे अवघड नाही. प्रकाश झा यांनी आपल्याच ‘आरक्षण’ या चित्रपटातही छोटीशी भूमिका केली होती.
प्रकाश झा यांचा आणि अलंक्रिता श्रीवास्तव यांनी दिग्दर्शित केलेला “लिपस्टिक अंडर माय बुरखा’ हा हिंदी चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे परवानगीसाठी पाठविण्यात आला होता. मात्र, चित्रपटात काही अश्लिल संवाद आणि दृश्ये असून तो समाजातील काही विशिष्ट घटकांसाठी संवेदनशील असल्याचे म्हणत कालच बोर्डाने चित्रपटाला परवानगी नाकारली आहे.
प्रकाश झा यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९५२ रोजी झाला. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा…
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply