अभिनेत्री पूर्णिमा यांचा जन्म दि. २ मार्च १९३२ रोजी झाला.
अभिनेत्री पूर्णिमा यांचे खरे नाव ‘मेहर बानो’ होते. पूर्णिमा यांचे वडील हे मनमोहन देसाई यांचे वडील किकूभाई देसाई जे फ़िल्म डिस्ट्रीब्यूटर होते त्यांच्या ऑफिस मध्ये अकाऊंट्सचे काम बघत होते. पूर्णिमा यांची आई मुस्लिम होती. पूर्णिमा यांना चार बहिणी व एक भाऊ. पूर्णिमा यांची मोठी बहीण शिरीन यांनी १९३०च्या दशकात ‘बम्बई की सेठानी’, ‘पासिंग शो’, ‘ख़्वाब की दुनिया’, ‘स्टेट एक्स्प्रेस’ व ‘बिजली’ अशा चित्रपटात कामे केली होती. शिरीन यांनी निर्माता-निर्देशक नानाभाई भट्ट यांच्या बरोबर लग्न केले होते, ती त्यांची दूसरी पत्नी होती. पूर्णिमा यांचे फिल्मकार महेश भट्ट हे शिरीन हे भाचे. व इमरान हाशमी हा नातू. पूर्णिमा शाळेत शिकत असताना निर्देशक रमन बी. देसाई यांनी गुजराती चित्रपट ‘राधेश्याम’ मध्ये राधा ची भूमिका करण्यासाठी विचारले. या चित्रपटात काम करण्यासाठी त्यांची बहीण शिरीन यांनी ‘मेहर बानो’ हे नाव बदलून ‘पूर्णिमा’ ठेवले. ‘राधेश्याम’ चित्रपट १९४८ साली प्रदर्शित झाला तेव्हा पूर्णिमा यांचे वय होते १६. पूर्णिमा यांचा पहिला हिंदी चित्रपट केदार शर्मा यांचा ‘ठेस’ हा होता त्यात त्या सहनायिका होत्या, भारतभूषण व शशिकला यांच्या मुख्य भूमिका होत्या. पूर्णिमा यांनी ‘मैनेजर’ , ‘तुम और मैं’, ‘जोगन’, ‘गौना’,‘बादल’, ‘बेबस’, ‘सगाई’,’शगूफा’, ‘पर्वत’, ‘जाल’, ‘शोले’ ,‘मेहमान’,‘औरत’ ,‘पूजा’ अशा चित्रपटात कामे केली. १९५४ साली त्यांनी निर्माता-निर्देशक भगवानदास वर्मा यांच्याशी लग्न करून बॉलीवूडला रामराम केला. पण तीन वर्षानी परत अभिनय चालू केला. त्यांचे हे दुसरे लग्न होते, पूर्णिमा यांनी पहिले लग्न फिल्म पत्रकार शौकत हाशमी यांच्या बरोबर झाले होते. ‘बदतमीज़’, ‘हमजोली’, ‘मेरा गांव मेरा देश’, ‘बैराग’, ‘ज़ंजीर’, ‘ख़ूनपसीना’, ‘मैं तुलसी तेरे आंगन की’, ‘धर्मकांटा’, ‘इंकलाब’ या चित्रपटात पूर्णिमा यांनी चरित्र अभिनेत्री म्हणुन काम केले.१९८६ साली आलेला ‘सदा सुहागन’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. पूर्णिमा यांनी बॉलीवूड मध्ये ३८ हून अधिक वर्षे काम केले व २०० हून अधिक चित्रपटात अभिनय केला.
पूर्णिमा यांचे १४ ऑगस्ट २०१३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply