जन्म.२६ एप्रिल १९४१
पॅरिस येथे जन्म झालेल्या डीन ऑगर यांनी १९६० साली मॉडेलिंग क्षेत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर जीन कॉकट्यु दिग्दर्शित ‘टेस्टमेंट ऑफ ऑरफ्युअस’ या फ्रेंच चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्याच दरम्यान त्यांना टेरेंस यंग दिग्दर्शित ‘थंडरबॉल’ या जेम्स बॉण्डपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात ‘डोमिनो’ ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या डीन ऑगर यांनी काही न्यूड सीन्स केले. त्यामुळे त्या खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आल्या.
जेम्स बॉण्ड चित्रपटात न्यूड सीन करणाऱ्या त्या पहिल्या अभिनेत्री होत्या. अनेक ॲडल्ट सीन्समुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या चित्रपटाला ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने एक्स प्रमाणपत्र दिले होते. परंतु डीनने या चित्रपटातून प्रेक्षकांचे मन जिंकले.
त्यानंतर ‘अ फ्यू आर्स ऑफ सनलाइट’, ‘द बर्म्युडा ट्रँगल’, ‘सीक्रेट प्लेस’, ‘एनिव्हन कॅन प्ले’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमधून त्यांनी आपल्या जबरदस्त अभिनयाचे प्रदर्शन केले.
६०-७०च्या दशकात हॉलिवूड सिनेसृष्टीतील सर्वात हॉट अभिनेंत्रींपैकी एक म्हणून त्यांनी लोकप्रियता मिळवली होती.
चित्रपट आणि मॉडलिंग निमित्ताने त्यांनी आपल्या कारकिर्दीतील बहुतांश काळ अमेरिकेत व्यतीत केला.
डीन ऑगर यांचे १८ डिसेंबर २०१९ रोजी निधन झाले.
Leave a Reply