नवीन लेखन...

ब्रह्मगिरी फार उंच पर्वत

वर्षातून एकदा डिसेंबर महिन्यामध्ये मी पंधरा दिवस फिरायला जात असतो. 35 वर्ष रेल्वे त नोकरी केली कुठे सुद्धा फिरता आले नाही रेल्वेची ड्युटी बारा तासाची फक्त मला एक फायदा झाला तो म्हणजे वाचन आणि लेखन. ड्युटी बरोबरच वाचन-लेखन असल्यामुळे माझा वेळ कधी जात होता हे मला समज त सुद्धा नव्हते इतका मी वाचनात आणि लेखनात रंगून गेलो होतो. माझ्या कथा-कादंबरी चा जन्म रात्रपाळीला झाला आहे हे मात्र निश्चित आठवड्यातून तीन दिवस वाचन व रात्रपाळीला लेखन असा प्रवास चालू होता. ही नोकरी करत असताना काही दिवस मी पत्रकार म्हणूनही काम केले तो अनुभव मी माझ्या साहित्यातून लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. 1977 ला मला महिना पगार 40 रुपये होता यामध्ये घरचा खर्च भागून महिन्याला 12 ते 13 रुपये शिल्लक राहत होते त्यावेळी स्वस्ताई होती हे सारे करत असताना माझी दमछा ट होत होती पण विलाज नाही. माझ्या आयुष्यामध्ये ज स दिवस आलं तसं तसं मी रेट त गेलो हे मात्र नक्की. सांगायचं म्हटलं तर एखाद्यावेळी आमचा पावना मेला तर मला रेल्वेमध्ये रजा मिळत नव्हती इतके पोझिशन टाईट होते मंडळी अधून-मधून मला काही पुरस्कार मिळत होते महाराष्ट्रातील पुरस्कार संस्था एक ही मला माहीत नव्हती याचं कारण असं होतं बारा तासाच्या ड्युटी मध्ये हे सारं पाहिला मला वेळ कमी होता. महाराष्ट्रातील पुरस्कारांची पत्ते मला माहीत नव्हते किंवा मी कोणत्याही पुरस्कार संस्थेला अर्ज कधी केला नाही माझ्याबाबतीत वर्तमानपत्रातून त्या संस्थेला माझी माहिती कळत गेली माझं साहित्य पाहून मला पुरस्कार देण्यात आले हे मात्र नक्की….l

…. काही माणसं म्हणतात वाचनाबरोबर लेखकाने फिरले पाहिजे त्याशिवाय लेखन लिहिता येत नाही ही हाऊस मी रिटायरमेंट झाल्यावर मी फिरू लागलो. दोन वर्षापूर्वी मला नाशिकला जाण्याचा योग आला नाशिकचा आसपासचा परिसर सारा पाहिला डोळ्याचं पारणं फिटलं. नाशिक मध्ये गेल्यावर आमचे ब्रह्मगिरी ला जायचे ठरले आम्ही सात आठ माणसे होतो ते भलेमोठे पर्वत गर्द हिरवीगार झाडी आणि वाऱ्याची मंदगतीने आलेली झुळूक माझ्या मनाला आल्हाद देत होती. ब्रह्मगिरी ची प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर पुण्याई मिळते अशी काही माणसे म्हणत होती ब्रह्मगिरी पर्वत चढताना मला फार कंटाळा आला होता सारा चढ मला भयानक वाटत होता. भयानक चढ असल्यामुळे मला हातात काठी घ्यावी लागेल आणि माझ्या पटकन लक्षात आले हातात काठी घेऊन शाळेमध्ये 15 ऑगस्ट ला करमणुकीच्या कार्यक्रमात मी मुलांच्या ओळी मध्येमधेगाम णे म्हणत होतो आले आजोबा ओटीत काठी टेकीत टेकीत हे पटकन आठवलं मला. तर काही माणसे म्हणत होती तुम्ही ब्रह्मगिरीला जाताय खरे पुढे माकडे आहेत जाताना शेंगदाणे व फुटाणे घेऊन जावा त्या माकडा ना शेंगदाणे फुटाणे दिल्याशिवाय पुढे सोडत नाही. म्हणून आम्ही शेंगदाणे आणि फुटाणे घेऊन गेलो होतो मध्यंतरी एका कड्यावरून दहा ते पंधरा माकड पर्वतावरून खाली आली लगेच आम्ही त्यांना फुटाण आणि शेंगदाणा त्यांच्या पुढे टाकला तशी ती माकडे पाठीमागे सरली. माकडे पाठीमागे असल्यामुळे आम्ही पुढे पुढे जाऊ लागले रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी दुकाने होती त्या दुकानात सरबत चहा खाण्याचे पदार्थ मिळत होते आम्ही ज्यावेळी ब्रह्मगिरी वर पोचलो त्यावेळी एका डोंगराच्या टाळूवर भलेमोठे मैदान होते त्या मैदानामध्ये एक झोप डी होती तिथे दोन माणसं काकड्या विकत होती तेथून आम्ही काकड्या खाऊन पुढे सरक लो ब्रह्मगिरी वर एका मोठ्या कड्यावर शंकराने जटा आपटल्या आहेत हे मंदिर पाहायला मिळाली तर दुसरीकडे वाढ वडिलांच्या नावाने पूजा बांधण्याचे काम गोदावरीच्या दोहा समोर चालू होते हेही पाहायला मिळाले….l

… दुपारचे ऊन थोडे होते पण ढगाळ वातावरण व हिरवीगार गर्द झाडी असल्यामुळे इतके जाणवले नाही. चढताना सव्वा पाच तास लागले उतरताना आम्ही लोकं लवकर उतरलो आमच्यातील काही माणसे म्हणाली आपण गहिनीनाथांची गुहा एका डोंगराच्या कड्यात आहे आपण पाहिला जाऊ आम्ही सर्वजण गहिनी नाथाच्या गुहेकडे जाऊन पोचलो. ज्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांची मुंज करायची होती त्यावेळी निवृत्ती सोपान मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर ही मंडळी त्र्यंबकेश्वर गेली होती त्यांची मुंज झाल्यावर ही मुलं ब्रह्मगिरी ला गेली. त्यावेळी या परिसरात जंगल फार होते ज्ञानेश्वर निवृत्ती सोपान आणि मुक्ताबाई ब्रह्मगिरीला आले आहेत अशी लिंक गहिनीनाथ यांना लागली कारण निवृत्ती नाथाला ब्रह्मज्ञान द्यायचे आहे म्हणून स्वतः गहिनीनाथ यांनी वाघाचे रूप धारण केले आणि वाघ होऊन या बहिण भावाची वाट चुकली. ज्ञानेश्वर सोपान आणि मुक्ताबाई ही एका बाजूने वाघ आला म्हणून पळत सुटली व निवृत्तीनाथ गहिनीनाथाचा गुहेजवळ आले. त्यांना गहिनीनाथांची दर्शन झाले आणि गहिनीनाथ म्हणाले माझा हेतू पूर्ण झाला परत तीन दिवस निवृत्तीनाथांना ब्रह्मज्ञानाचा अभ्यास देऊन उपक्रम केले व तीन दिवसांनी ज्ञानेश्वर सोपान व मुक्ताबाई गहिनी नाथांच्या गुहेजवळ आल व सर्वांची भेट झाली असे मला माणसातून समजले. ति च ही पर्वताला खड्डा पाडून तयार केलेली गुहा व या गुहेत काही काल गहिनीनाथांनी साधना केली आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच संतांनी ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर या भागातूनच साधना केली आहे मंडळी ति च ही गुहा…. धन्यवाद…l

-दत्तात्रय मानुगडे

Avatar
About दत्तात्रय पांडुरंग मानुगडे 30 Articles
दत्तात्रय मानुगडे हे ग्रामीण कथा लेखक आहेत. त्यांचे वास्तव्य किर्लोेकरवाडी येथे असते. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..