नवीन लेखन...

साखरेवरील कंट्रोल सुधारण्यासाठी ब्रेकफास्ट महत्वाचा असतो का?

Breakfast is important for type 2 diabetic

आपल्या रोजच्या आहारात ब्रेकफास्ट घेणे आवश्यक आहे. प्रयोग ही असेच दाखवतात कि सकाळचा नाश्ता (ब्रेकफास्ट) न घेतल्यास लठ्ठपणा, ह्रदय रोग वाढतोय पण डायबेटिक व्यक्तीच्या आरोग्यावर ही त्याचा परिणाम होऊ शकतो असे ही दिसत आहे. त्यामुळेच ह्यावरच संशोधन होणे गरजेचे आहे. ह्या विषयावर संशोधन करण्यासाठी डॉक्टर Daniela Jakubowwicz आणि त्यांच्या सहकारयांनी “Substantial Impact of Skipping Breakfast on Type 2 diabetics” (नाश्ता न केल्यास टाईप 2 डायबेटीस असलेल्या व्यक्तींच्या आरोग्यावर काय परिणाम होतो) ह्या विषयी अध्यापन केले. ह्या अध्यापनाचे निकष डायबेटिस केअर ह्या नियतकालिके मध्ये प्रसिद्ध केले आहेत. तसेच बोस्टन येथे 2015 मध्ये झालेल्या अमेरिकन डायबेटिस असोसिएशनच्या परिषदेतही ह्याचे सादरीकरण केले होते.

ह्या अध्यापनासाठी टाईप2 डायबेटिस असलेल्या 22 व्यक्तींची निवड करण्यात आली. त्यांचे सरासरी वय 56.9 वर्षे होते आणि बॉडी मास इंडेक्स 28.2 kg/m2 होता. ह्या सहभागी व्यक्तींना 2 दिवससाठी तंतोतंत जुळतील अशाच कॅलरीजचा पण समतोल आहार खाण्यास दिला. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात त्यांना – दूध, ट्यूना नावाचा मासा, पाव (ब्रेड) आणि चाॅकलेट ब्रेकफास्ट बार खाण्यास दिले. दोन्ही दिवसात फक्त एकच फरक केला होता की एक दिवस ह्या व्यक्तींना ब्रेकफास्ट खायला दिला होता आणि दुसर्या दिवशी त्यांना ब्रेकफास्ट खायला दिला नव्हता.

imageह्या अध्यापनातून असे आढळले की सहभागी व्यक्ती ज्यांनी ब्रेकफास्ट घेतला नाही त्यांच्या साखरेमध्ये जास्तच वाढ झालेली आढळली. त्यांच्या दोन्ही दिवसाचं साखरेचे प्रमाण खालील प्रमाणे होते.

ह्या वरून असे निदर्शनास येते आहे की जर डायबेटीक व्यक्तींनी ब्रेकफास्ट घेतला नाही तर त्यांच्या पूर्ण दिवसाच्या साखरे वर नियंत्रण राखण्यात ते अपयशी ठरतात. जर डायबेटीक व्यक्तींनी ब्ब्रेकफास्ट न घेतल्यास जेवणात किती स्टार्च घेतला किंवा किती साखर घेतली ह्या गोष्टीचा त्यांचा साखरेच्या नियंत्रणावर काही परिणाम होत असावा असे दिसत नाही असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

ज्या वेळेस तुम्ही ब्रेकफास्ट करत नाही त्यावेळेस रात्रीचे जेवण आणि दुपारच्या जेवणात बराच मोठा कालावधी गेला असल्याने पॅनक्रीयाटीक बीटा सेल जे इनसुलीन तयार करते त्यांची स्मृती कमी होत असावी असा शास्त्रज्ञांचा कयास आहे आणि त्यामुळेच थोडा कमी आणि जरा उशीराच इनसुलीनचा प्रतिसाद मिळत असावा असे ही शास्त्रज्ञांना वाटते. ह्याचा परिणाम म्हणून दिवसभरातील साखरेवरील नियंत्रण बिघडत असावे.

साखर बिघडण्याचे दुसर कारण म्हणजे दुपारच्या जेवणा पर्यंत उपाशी राहिल्याने रक्तातील फॅटी अॅसिड चे प्रमाण वाढते त्यामुळे रक्तातील साखर कमी करण्यास इनसुलीन कुचकामी ठरते आणि त्यामुळे पण रक्तातील साखर वाढलेली राहाते.

ह्या प्रयोगावरून असंच सिद्ध होते आहे की टाईप 2 डायबेटिस असलेल्या व्यक्तींच्या रक्तातील साखरेवरील नियंत्रण चांगले राहण्यास त्यांनी ब्रेकफास्ट न टाळता दररोज घेणे जरुरीचे आहे.

Avatar
About डॉ. शीतल म्हामुणकर 20 Articles
डॉक्टर शीतल म्हामुणकर ज्येष्ठ आहारतज्ज्ञ आहेत. त्या या क्षेत्रात ३० हून अधिक वर्षे कायरत असून क्रिडापटूंसाठी आहाराचे नियमन या विषयावर त्यांनी बरेच काम केले आहे. डॉ. म्हामुणकर या प्रिव्हेंटा क्लिनिक या संस्थेच्या संचालिका आहेत. आहाराचे नियमन या विषयावर त्यांनी बरेच लिखाण केले आहे.

1 Comment on साखरेवरील कंट्रोल सुधारण्यासाठी ब्रेकफास्ट महत्वाचा असतो का?

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..