लहानांपासून थोरापर्यंत सकाळी-सकाळी नाश्त्याची आवश्यकता असते. रात्रभर शरीराने विश्रांती घेतली असली तरीही हा नाश्ता खूप उपयोगी आहे व जेवणाच्या कालावधीपर्यंत ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी उत्तम आहे. मात्र हा नाश्ता प्रत्येक ऋतुमानानुसार घेणं आवश्यक आहे. केवळ चहा पिणे म्हणजे रोगाला निमंत्रण देण्यासारखे आहे.
नाश्ता म्हणजे काय ?
सकाळी ९ च्या अगोदर नाश्ता महत्वाचा आहे. भरपेट जेवण म्हणजे नाश्ता नव्हे. नाश्त्यात बेकरीचे ब्रेड, बिस्किटे, तळलेले पदार्थ, वनस्पती तूप यांचा वापर घातक आहे. कृत्रिम पेये, नमकीन पदार्थ यांचाही वापर योग्य नाही. मोड आलेली कडधान्ये, उपीट, पोहे, शिरा, इडली, गूळ-शेंगदाणे, दूध, फळे आदींनी युक्त नाश्ता असावा. शिवाय तो प्रत्येकाच्या व्यवसायावरही ठरलेला असावा.
Leave a Reply