नवीन लेखन...

स्तनपान भाग १

उत्क्रांतीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे सस्तन प्राणी. सस्तन प्राण्यातील स्तनपान ही निसर्गाची किमया आहे. लालभडक रक्तापासून पांढरेशुभ्र दूध तयार करणे आणि तेही थोडक्या वेळात, गरजेनुसार बदलणाऱ्या घटकांच्या प्रमाणात हे एक अनाकलनीय सत्य आहे. उच्चभ्रू समाजातील भ्रामक कल्पनांपैकी एक म्हणजे बाळंतपणानंतर मुलाला पाजणे ही जुन्या जमान्यातील गावठी पद्धत! बाळाच्या आरोग्यापेक्षा | स्वतःच्या शरीरसौष्ठवाला महत्त्व जास्त. स्तन ही स्त्रियांना निसर्गाकडून लाभलेली बहुमोल देणगी आहे. मध्यंतरीच्या काळात समाजातील काही स्त्रियांना याचा विसर पडला; परंतु आता त्याचे महत्त्व पटू लागले आहे. एका पेडिअॅट्रिक जर्नलने एप्रिल २०१० साली प्रसिद्ध केलेल्या सर्वेक्षणानुसार अमेरिकेत निदान ९० टक्के स्त्रियांनी किमान ६ महिने व्यवस्थित स्तनपान केल्यास प्रतिवर्षी ९०० बालकांचा मृत्यू टाळता येईल व करोडो डॉलर्सचा खर्च वाचेल. कुमारावस्थेच्या आधी मुलगा व मुलगी यांच्या स्तनात विशेष फरक नसतो. त्यानंतर संप्रेरकांचा (हॉरमोन्स) परिणाम होऊन मुलींच्या स्तनात वाढ होते.

गरोदरपणात विशेष बदल होऊन बाळंतपणात ते पूर्णत्वाला जातात. एका विशिष्ट संख्येत असलेल्या दुग्धग्रंथी दूधनिर्मिती करतात. ही संख्या स्तनाच्या आकारावर अवलंबून नसते. स्तनाग्रांत छोटी-छोटी छिद्रे असतात. ही दुग्धनलिकेची मुखे. स्तनाग्राभोवती १/२ ते ३/४ इंच भाग गडद रंगाचा असतो.

त्याला ‘एरिओला’ असे म्हणतात. या भागात असलेल्या तेल सदृश पदार्थ निर्माण करणाऱ्या ग्रंथींमुळे हा भाग जरा खडबडीत असतो. प्रत्येक स्तनात १५ ते २० रुपये (लोब्ज) असतात. याच्या अवतीभोवती असलेल्या मेदाच्या पेशी व अन्य काही पेशींमुळे स्तनाला आकार प्राप्त होतो. प्रत्येक कप्प्यात छोटेखानी खंड (लोब्युल्स) असतात. यात द्राक्षांच्या घडासारखे अनेक दुग्धकोश (ऑलव्हियोला) असतात. याच दूध स्रवणाऱ्या ग्रंथी होय. त्यांच्याभोवती असलेल्या स्नायूंच्या पेशी आकुंचन पावल्या, की दूध स्तनाग्राकडे ढकलले जाते. दूध स्रवणाऱ्या ग्रंथीतून दूध लहान लहान नळ्यांतून येते. स्तनाग्राजवळ या नळ्या रुंदावतात. (लॅक्टिफेरस सायनस) दूध काही काळ यात राहते व बाळ अंगावर पिताना बाळाला या पोकळ नळ्यातील दूध स्तनाग्रातील छिद्रावाटे ओढून घ्यावे लागते. त्यासाठी बाळाचे ओठ एरिओलावर टेकले पाहिजेत म्हणजे त्या दाबाने दूध व्यवस्थित पिता येते.

डॉ. विनोदिनी प्रधान
मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..