नवीन लेखन...

स्तनपान – भाग २

नवजात बालकाला पहिल्या १/२ ते १ तासांत स्तनपान करावे. पहिल्या ७२ तासांत येणारे दूध-चीक (कोलोस्ट्रम) हे घट्ट, चिकट व पिवळसर असते. सुरुवातीचे ३० ते ९० मि.मि. दूध नवजात बाळाला पुरेसे असते. यामध्ये प्रथिने आणि ‘अ’ व ‘के’ जीवनसत्त्व अधिक प्रमाणात असतात. जन्मतःच कमी प्रतिकारशक्ती असलेल्या बालकाला यातून प्रतिकारशक्ती मिळते. त्यातील ‘इम्युन्योग्लोबिन्स’ बाळाच्या आतड्याच्या अंतःत्वचेवर पसरतात. त्यामुळे स्वतःची प्रतिकारशक्ती निर्माण होईपर्यंत बाळाचे रोगांपासून संरक्षण होते.

दुधातील वेगवेगळे घटक त्या त्या विशिष्ट वेळी विशिष्ट प्रमाणात निर्माण होत असल्याने सर्व बाबतीत बाळाला संरक्षण देतात. बाळाच्या नैसर्गिक क्रिया कार्यरत करण्यास त्याची मदत होते. दुधातील पांढऱ्या पेशी जंतुसंसर्गापासून संरक्षण देतात. बाळाच्या आतड्यात असलेल्या लॅक्टोबॅसिलस बायफिडसूची वाढ होण्याकरिता बायफिड्स फॅक्टर आवश्यक असतो.
त्यामुळे आतड्यात हगवणीसारखे रोग निर्माण करणाऱ्या जंतूंची वाढ होत नाही. दुधातील लायसोझोम घटक जंतूंचा नाश करतो.

मातेच्या दुधातील लॅक्टोफेरिन हा घटक लोह आपल्याकडे खेचून घेतो. त्यामुळे ज्या जंतूंच्या वाढीसाठी लोहाची आवश्यकता असते त्या जंतूंची वाढ खुंटते व जंतुसंसर्ग होत नाही. दोन आठवड्यानंतर दुधाचे प्रमाण वाढत जाते. त्यातील घटक बदलतात. प्रथिने कमी होऊन मेद व दुग्धशर्करेचे प्रमाण वाढते. आईच्या दुधातील प्रतिकारक्षमता हे बाळाचे पहिले लसीकरण. सिझेरिअनच्या ऑपरेशननंतरसुद्धा अर्ध्या तासात स्तनपान केल्याने हे सर्व फायदे नवजात बालकाला मिळतात.

आईचे दूध साधारणतः दिवसाकाठी एक लिटर तयार होते. त्यातून बाळाला रोज ३८ ग्रॅम मेद, ७० ग्रॅम दुग्धशर्करा व १२ ग्रॅम प्रथिने मिळतात. दूध तयार होण्याच्या प्रक्रियेसाठी ‘प्रोलॅक्टिन’ या संप्रेरकाची गरज. असते, तर दूध स्तनातून बाहेर पडण्यासाठी ‘ऑक्सिटोसिन’ नावाचे संप्रेरक कारणीभूत होते. पिच्युइटरी या ग्रंथीत तयार होणाऱ्या या दोन्ही संप्रेरकांना बाळाच्या स्तनाग्र चोखण्यामुळे चालना मिळते. याशिवाय ऑक्सिटोसिनमुळे प्रॅस्टेनच्या तुटलेल्या रक्तवाहिन्या बंद होण्यास मदत होते व गर्भाशयातून होणारा रक्तस्राव कमी होतो. पर्यायाने गर्भाशयाचा आकार पूर्ववत होण्यास मदत होते. मातेसाठी होणारा स्तनपानाचा हा फार मोठा फायदा आहे.

डॉ. विनोदिनी प्रधान
मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..