ब्रिटिश अभिनेते डॅनियल क्रेग यांचा जन्म. २ मार्च १९६८ रोजी झाला.
डॅनियल क्रेग यांनी १९९२ साली ‘द पॉवर ऑफ वन’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. आपल्या पहिल्यावहिल्या अशा ‘कसिनो रोयाल’मधून एन्ट्री केल्यानंतर पुढे ‘क्वांटम ऑफ सोलास’, नंतर ‘स्कायफॉल’ आणि ‘स्पेक्टर’ अशी बॉण्डपटांची मालिका डॅनियल क्रेग यांनी साकारली. ‘चेस्टर’, ‘जेम्स बाँड’ व्यतिरिक्त ‘कॅसिनो रॉयल’ आणि ‘नो टाइम टू डाय’ ‘अ किड इन किंग आर्थर कोर्ट’, ‘अवर फ्रेंड इन द नॉर्थ’, ‘एलिझाबेथ’, ‘लारा क्रॉफ्ट’ आणि ‘लायर केक’ सारख्या चित्रपटांसाठी ओळखला जातात.
जेम्स बॉंड या जगप्रसिदध गुप्तहेराची भूमिका तब्बल पाच चित्रपटांच्या माध्यमातून निभावणाऱ्या डॅनियल क्रेगला खऱ्या गुप्तहेरांसाठी देण्यात येणाऱ्या ‘कम्पॅनिअन ऑफ द ऑर्डर ऑफ सेंट मायकेल अॅन्ड सेंट जॉर्ज- सीएमजी’ (Companion of the Order of St. Michael and St. George -CMG) पुरस्कार गेल्या वर्षी डॅनियल क्रेग यांना देण्यात आला आहे. हा पुरस्कार ब्रिटिशांसाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुप्तहेरांसाठी दिला जातो. पण डॅनियल क्रेग यांना हा पुरस्कार देण्यात आल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या होत्या. डॅनियल क्रेग यांना हा पुरस्कार ‘चित्रपट आणि थिएटर’मध्ये दिलेल्या योगदानासाठी देण्यात आला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply