ब्रिटिश अभिनेता पीटर सेलर्स यांचा जन्म ८ सप्टेंबर १९२५ पोर्ट्समाउथ इंग्लंड येथे झाला.
पीटर सेलर्स यांचे आई वडील रंगकर्मी होते त्यामुळे त्यांनी लहानपणापासून अभिनयास सुरुवात केली. पीटर सेलर्स यांनी आपल्या करीयरची सुरुवात स्टेज कलाकार म्हणून किंग्स थिएटर, साउथसी पासून केली. सुरुवातीच्या काळात ते ड्रमर म्हणून नावारूपास आले. त्यांनी एंटरटेनमेंट्स नेशनल सर्विस एसोसिएशन (ENSA) चे सदस्य म्हणून पूर्ण इंग्लंडचा दौरा केला. महायुद्धा नंतर सेलर्स नियमित पणे बीबीसी रेडियो शो मध्ये एक कलाकार म्हणून काम करू लागले. १९५० च्या दशकातील सुरुवातीच्या काळात स्पाइक मिलिगन, हैरी सेकोम्बे व माइकल बेंटाइन यांच्या बरोबर सेलर्स यांनी ‘द गून’ या शो मध्ये भाग घेतला, जो शो १९६० मध्ये समाप्त झाली.
पीटर सेलर्स यांचे आई एम ऑल राइट जैक (१९५९) लोलिता (१९६२) डॉ. स्ट्रैंगेलोव (१९६४), व्हाट्स न्यू, पुसीकैट (१९६५), कैसीनो रोयाले (१९६७), द पार्टी (१९६८), बीइंग देयर (१९७९) व पिंक पैंथर श्रृंखला (१९६३-७८) हे चित्रपट गाजले. पीटर सेलर्स यांचे निधन २४ जुलै १९८० रोजी झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply