आजच्या ‘ब्रेकिंग न्यूज’च्या जमान्यात बातमीची विश्वासार्हता ही चोळामोळा करून फेकून द्यायची गोष्ट झाली आहे. अशा परिस्थितीतही बातमीचे पावित्र्य जपणाऱ्या ज्या काही मोजक्या प्रसारण संस्था जगात आहेत, त्यात अजूनही ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशन म्हणजे बीबीसी चे नाव घेतले जाते.
१८ ऑक्टोबर १९२२ साली बीबीसी प्रसारणाला लंडन मध्ये सुरवात झाली. याचे संस्थापक जॉन रिमथ होते. बीबीसी हे जगातील सर्वात मोठे न्यूज ब्रॉडकास्टिंग नेटवर्क आहे. बीबीसी मध्ये ३५००० हून अधिक कर्मचारी काम करतात हैं. बीबीसी न्यूज चे प्रसारण टीवी, रेडियो, वेबसाइट्सच्या माध्यमातून सर्व जगात २८ भाषेत केले जाते. १९ डिसेंबर १९३२ साली बीबीसी ने आपली बीबीसी वर्ल्ड सर्विसची सुरवात केली. बीबीसीचे मुख्यालय Broadcasting House London, W1, United Kingdom येथे आहे.
भारतात बीबीसी हिंदीची सुरुवात ११ मे १९४० मध्ये झाली.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply