ब्रिटीश वैद्यक जेम्स पार्किन्सन यांचा जन्म ११ एप्रिल १७५५
१८१७ साली ब्रिटीश वैद्यक जेम्स पार्किन्सन यांनी प्रथम या आजाराची स्थिती लोकांच्या नजरेस आणून दिली ‘पार्किन्सन रोग’ ह्या या आजाराचा शोध लावणाऱ्या जेम्स पार्किन्सन याच्या नावाने हा आजार ओळखला जातो.
मेंदूचा जो भाग शरीराच्या हालचालींवर नियंत्रण करतो त्या भागातील चेतापेशींचा हळूहळू नाश जिच्यात होतो ती विकृती म्हणजे कंपवात. हातांना कंप सुटणे, स्नायू ताठर होणे, हालचालींमध्ये शिथिलता येणे आणि शरीराचा तोल सांभाळण्यात अडचण येणे. ही या विकाराची मुख्य लक्षणे आहेत. कंपवात झालेली व्यक्ती स्थिर बसलेली असताना त्या व्यक्ती उभी राहिल्यास तिचे धड पुढे कलालेले दिसते.” पार्किन्सन हा असा आजार आहे ज्यात मेंदूतील चेतापेशी मरतात व सुरुवातीला हा आजार हालचालींवर परिणाम करतो व नंतर शरीरात कंप निर्माण होतो. मेंदूमधील चेतापेशींद्वारा डोपामाइन नावाच्या रसायनाचे पुरेसे निर्माण होत नाही तेव्हा हा आजार होतो. हा आजार होण्याचे प्रमाण स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये जास्त असल्याचे आढळून आले आहे.
जेम्स पार्किन्सन यांचे निधन २१ डिसेंबर १८२४ रोजी झाले.
Leave a Reply