ब्रम्हांडातील ग्रहतारे, दुरून मजसी दिसती,
सारे सवंगडी माझेच,
राहती दूर अंतरी,–!!!
नाव माझे वसुंधरा,
माझ्यावरच जगते सृष्टी,
सृजनाची किमया न्यारी,
पाहता पाहता झाली मोठी,–!!!
खाली मी एकटी, एकाकी,
आभाळा पाहत राहते,
भास्कर करतो वंचना तरी,
सारखी सहज सहत राहते,–!!!
सहनशीलता का माझ्यागत,
सांगा आहे कोणामध्ये,
अंतराळातून वेगळे काढले,
दुःख माझ्या काळजामध्ये,–!!!
माता म्हणून स्वीकारले,
मी माझे एकटेपण,
लेकरांसाठी जन्म अवघा,
वहायाचा आता ठरवून,–!!!
माझ्या मातीत सारी जगती,
सकल चराचर सृष्टी,
मानवप्राणी वृक्षवेली,
यांसाठी ती खरी संजीवनी,–!!!
मातीतून जन्मती,–
मातीतच जाती,—
पुन्हा कालांतराने वर येती,
अखंड असे चक्र चालू राही, मानवांना मात्र कदर नाही,–!!!
जो उठे तो घाव घाले,
माझिया हृदयावरी,
करत सारखी भाऊबंदकी, नात्यातही मोजमाप करी,–!!!
मानवाइतुका स्वार्थी,
कोणी बघितला नाही,
आईवर घाव घालायां,
कमी जराही करत नाही,–!!!
जमिनीच्या तुकड्यांसाठी परस्परांच्या जिवावर उठती,
*तीव्र शूळ उठे उरी,
माझे जगणे माती माती*,–!!!?
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply