नवीन लेखन...

ब्रॉडबॅण्ड इंटरनेट

एकविसाव्या शतकात ब्रॉडबॅण्डने माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी क्रांती केली आहे.

इंटरनेट जेव्हा आले, तेव्हा लोकल एरिया नेटवर्क म्हणजे लॅन या सिस्टीमच्या मदतीने काही संगणक एकत्र काम करू शकत होते. इंटरनेटवर जेव्हा आपण एखाद्या विषयाचे सर्च देतो तेव्हा जगातील हजारो संगणकांच्या जाळ्यामार्फत आपल्याला हवी ती माहिती मिळते. याचा अर्थ हे संगणक एकमेकांच्या संपर्कात असतात, माहितीची देवाणघेवाण करीत असतात.

टेलिफोनचा शोध लावला, तेव्हा तो माणसांना दुरून एकमेकांशी बोलता यावे हा उद्देश होता, पण नंतर विसाव्या शतकात फॅक्स मशिनने छापील मजकूर एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठवता आला. १९७० च्या सुमारास संगणकांचे जाळे तयार करण्यासाठीही टेलिफोनचा वापर होऊ लागला; फक्त हे संगणक टेलिफोनकडून माहिती स्वीकारणार कसे, हा प्रश्न होता कारण टेलिफोन चालतो तो अॅनलॉग माहितीवर पण संगणक चालतो डिजिटल माहितीवर. मग हे गणित जुळत नव्हते त्यासाठी डिजिटल माहिती अॅनलॉगमध्ये तर ॲनलॉग माहिती डिजिटलमध्ये रूपांतरित करणारे मॉडेम (मॉड्युलेटर-डिमॉड्युलेटर) हे उपकरण शोधले गेले.

जेव्हा आपण संगणकावर संदेश पाठवीत असतो किंवा माहिती मिळवीत असतो, तेव्हा दोन संगणकांत किंवा अनेक संगणकांत चक्क संभाषण होत असते असे म्हणायला हरकत नाही. त्यात दुभाषाचे काम हा मॉडेम करीत असतो. डायल अप इंटरनेटमध्ये तुम्हाला सेवा देणाऱ्या कंपनीच्या संगणकाशी तुमचा कॉल जोडला जातो, तुमची सगळी टेलिफोन लाइन व्यस्त राहते शिवाय माहिती मिळण्याचा वेगही कमी म्हणजे सेकंदाला ५६ किलो बाइट्स इतका असतो. त्यामुळे डाऊनलोडला वेग लागतो.

ब्रॉडबॅण्डमध्ये फोनलाइनऐवजी तुमचा संगणक व इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीचा संगणक यांच्या दरम्यान एक अरुंद नळी जोडली जाते, त्यामुळे अनेक मार्गिका तयार होतात. त्याचा फायदा असा होतो की, अनेक पदरी असा माहितीचा महामार्ग तयार होतो. वेगाने माहिती मिळू लागते.

अनेकदा आपण अपलोडपेक्षा डाऊनलोड अधिक करतो. त्यामुळे डाऊनलोडिंगसाठी जास्त मार्गिका असतात. त्यालाच अॅसिमिट्रिक डिजिटल सबस्क्रायबर लाइन म्हणजे (एडीसीएल) म्हणतात. डीएसएल ब्रॉडबॅण्डमध्ये तुम्ही सारख्याच वेगाने डाऊनलोड व अपलोड करू शकता. यात फोन कॉल्ससाठी वेगळी मार्गिका असते व इंटरनेटसाठी वेगळ्या मार्गिका असतात. दोन व्यक्तींमधील टेलिफोन संभाषण हे कमी फ्रीक्वेन्सीवर चालते. संगणकाला जोडलेले मॉडेम हे जास्त फ्रीक्वेन्सीच्या सिग्नलवर चालते त्यामुळे त्यांची सरमिसळ होण्याचा धोकाही नसतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..