मन आपलं धावतं कुठही कसही. मन प्रश्न निर्माण करतं आणि जीवनाला अर्थही देतं..
मन नेहमीच अननुभवी असतं असं थोरो म्हणून गेलाय..
मला यात थोडाशी भर घालावीशी वाटली. मन आपलं धावतं, कुठही अन् कसही हे खरंय..’मन वढाय वढाय, जस पिकातलं ढोरं..’ हे बहिणाबाईंनीही सांगीतलंय.
मन त्याला आवडणाऱ्या जागी पुन्हा पुन्हा जातं तसं ते एखाद्या ठेच लागलेल्या जागी देखील पुन्हा पुन्हा धाव घेतं. अगदी एखाद्या जखमेवरच नेहेमी मार लागत राहावा तसं..
मन अनुभवाला नाही, अनुभुतीला ओळखतं..
‘मन’ अनुभव घेऊनही नेहमीच अननुभवी असतं,
अनुभवातून शिकते ती ‘बुद्धी’..!
माणसाला एकवेळ बुद्धी नसली तर फारसं काही बिघडणार नाही पण मन मात्र हवंच हवं..
— नितीन साळुंखे
Leave a Reply