भगवान श्री गणेश यांच्या उजव्या हाताला असणाऱ्या शक्तीला श्रीमहाबुद्धी असे म्हणतात.
भगवती महाबुद्धी शुभ्रवर्णा, श्वेतवस्त्रा वर्णन केलेली असते.
पांढरा हा पावित्र्याचा ,शांतीचा, सुखाचा, समाधानाचा, परिपक्वतेचा वर्ण आहे. त्याचप्रमाणे तो सर्वोच्च तत्वाचा ही वर्ण आहे. त्यामुळेच प्राचीन काळात सम्राटांचा ध्वज पांढऱ्या रंगाचा असायचा.
या भौतिक सृष्टीत असणाऱ्या समस्त घटकांपैकी सर्वोच्च घटक म्हणून महापूजेची श्वेतवस्त्रा, श्वेतवर्णीय असते.
देवी बुद्धीच्या एका हातात तिने कमळ धारण केलेले असते. पंचमहाभूतात्मक संपूर्ण आनंद, जीवाची उत्कर्ष अवस्था आणि संसाराची आकर्षकता अशा अनेक गोष्टीचे ते प्रतीक असते.
आई बुद्धीच्या दुसऱ्या हातात पूजा पात्र असते. त्यात प्राधान्याने प्रज्वलित दीपक असतो.
त्या बुद्धीने दाखविलेल्या प्रकाशात ज्या बुद्धिपतीच्या प्राप्तीचा साधनामार्ग उजळून निघतो त्या भगवान गणेशांना श्री महाबुद्धीश असे म्हणतात.
–प्रा. स्वानंद पुंड.
Leave a Reply