भगवान श्री गणेशाच्या अत्यंत प्रिय पदार्थांमध्ये सर्वोच्च तीन पदार्थ आहेत शमी, मंदार आणि दूर्वा.
और्व मुनींची ही कन्या आणि धौम्य ऋषी चा मंदार नामक पुत्र भगवान श्री भृशुंडी महर्षींच्या शापामुळे वृक्षात्वाला प्राप्त झाले. पुढे त्यांनीच सांगितलेल्या मंत्राद्वारे या दोन्ही ऋषींनी भगवान गणेशांची आराधना केली.
आशीर्वाद स्वरूपात भगवान गणेश त्या वृक्षांमध्ये निवास करू लागले. तेव्हापासून शमी आणि मंदार भगवान गणेशांना अत्यंत प्रिय आहेत.
क्वचित प्रसंगी दूर्वा उपलब्धच नसल्या तर शमीपत्राने देखील मोरया ची पूजा संपन्न होते इतका शमीचा मोठा अधिकार आहे.
शमीला सर्व तेजाचे अधिष्ठान म्हटले आहेत. यज्ञामध्ये अग्नी प्रज्वलित करण्यासाठी वापरली जाणारी अरणी शमीच्या वृक्षापासून बनवतात.
शमी शमयते पापम् ! अर्थातच शमी सर्व पापांचे निवारण करते.
शमी शत्रू विनाशिनी ! अर्थात ती सगळ्या शत्रूंचा विनाश करते.
श्रीक्षेत्र अदोष येथे भगवान श्री वामन यांनी शमी विघ्नेशांचे आराधन केले होते.
गाणपत्य संप्रदायात विजयादशमीच्या दिवशी विशेष पूजनीय असणाऱ्या या शमीच्या मुळाशी निवास करणाऱ्या भगवान गणेशांना श्री शमी विघ्नेश असे म्हणतात.
— प्रा. स्वानंद पुंड.
Leave a Reply