नवीन लेखन...

बौद्ध पोर्णिमा

जगाला शांततेचा, अहिंसेचा, समतेचा संदेश देणाऱया तथागत गौतम बुद्धांची ‘वैशाख बुद्ध पौर्णिमा’ जगभरात विविध ठिकाणी उत्साहात साजरी होत आहे. याच पौर्णिमेला बुद्धाच्या जीवनात पाच अत्यंत महत्त्वाच्या घटना घडल्या; त्या म्हणजे १. राजपुत्र सिद्धार्थ गौतमचा जन्म, २. राजकन्या यशोधरेचा जन्म, ३. राजकुमार सिद्धार्थचा मंगलपरिणय (विवाह), ४. ज्ञानप्राप्ती, ५. महापरिनिर्वाण

वैशाख पौर्णिमेला पाली भाषेत ‘वेसाक्को’ म्हणतात. वर उल्लेखिलेल्या पाच अतिशय लक्षणीय घटनांमुळे या पौर्णिमेला अलौकिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. नेपाळच्या पायथ्याशी वसलेल्या लुम्बिनीच्या वनात ख्रिस्तापूर्व ५३६ साली कपिलवस्तूची महाराणी महामाया देवीने बाळाला जन्म दिला. बाळाचे नाव ‘सिद्धार्थ’ असे ठेवण्यात आले. सिद्धार्थच्या वडिलांचे नाव शुद्धोधन होते.

बुद्ध यांनी तपश्चर्या केल्याने पिंपळवृक्ष बोधीवृक्ष म्हणून नावारुपास आला. बोधीवृक्षाला जागतिक वारसा सूचीत सामावून घेतले आहे. भारताप्रमाणे नेपाळ, चीन, जपान, लायवान, कोरिया, लाओस, व्हिएतनाम, थायलंड, कंबोलिया, मलेशिया, श्रीलंका, म्यानमार, इंडोनेशिया अशा अनेक देशात बुद्ध पौर्णिमा मोठया उत्साहात साजरी केली जाते.

तथागत बुद्धांनी दिलेला ‘चरथ भिक्खये चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हा संदेश शेकडो वर्षे लोकांना प्रकाशवाट दाखवत आहे, याचेच प्रचीती यानिमित्ताने येत आहे ख्रिश्चन आणि इस्लाम धर्माच्या आधी बौद्ध धर्माची स्थापना झाली होती. या दोन धर्मांनंतर बौद्ध हा जगातील तिसरा मोठा धर्म आहे. चीन, जपान, कोरीया, थायलंड, कंबोडिया, नेपाळ, श्रीलंका, भुतान व भारत या देशांत बौद्ध धर्माचे अनुयायी मोठ्या प्रमाणात सापडतात. गुप्तकाळात हा धर्म ग्रीस, अफगाणिस्तान व अनेक अरब देशांत पोहोचला होता. परंतु, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मामुळे त्याचे उच्चाटन झाले. बौद्ध हा नास्तिकांचा धर्म आहे. कर्मामुळेच जीवनात सुख व दुःख येते. त्यामुळे सर्व कर्मातून मुक्त होणे म्हणजेच मोक्ष मिळविणे अशी बौद्ध धर्माची शिकवण आहे. कर्मातून मुक्त होण्यासाठी आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी चार आर्य सत्य समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी अष्टांग मार्गाचा अभ्यास केला पाहिजे. त्या द्वारेच मोक्ष मिळू शकेल असे हा धर्म सांगतो.

भगवान बुद्धांनी स्थापन केलेल्या या धर्मात हिनयान व महायान हे दोन संप्रदाय आहेत. वैशाख महिन्यातील पौर्णिमेला बुद्ध जयंती असते. बौद्ध धर्मियांची प्रमुख चार तीर्थ स्थळे आहेत. लुंबिनी, बोधगया, सारनाथ आणि कुशीनगर. बौद्ध धर्मग्रंथाला त्रिपिटक असे म्हटले जाते.

भगवान बुद्धाला गौतम बुद्ध, सिद्धार्थ, तथातगत व बोधिसत्व या नावानेही ओळखले जाते. बुद्धाचे वडिल कलिलवस्तुचे राजा शुद्धोधन हे होते. त्यांच्या आईचे नाव महामाया देवी असे होते. बुद्धाच्या पत्नीचे नाव यशोधरा आणि मुलाचे नाव राहूल होते.

बुद्धाचा जन्म वैशाखातील पौर्णिमेच्या दिवशी नेपाळमधील लुंबिनी येथे इसवी सन पूर्व ५६३ मध्ये झाला. याच दिवशी इसवी सन ५२८ ला बोधगया येथे त्यांना सत्याची प्राप्ती झाली. याच दिवशी इसवी सन ४८३ ला ८० व्या वर्षी कुशीनगर येथे त्यांचे निर्वाण झाले.

बुद्धाला ज्या दिवशी सत्याची प्राप्ती झाली, त्याच दिवशी ते काशीजवळील सारनाथ येथे गेले. तेथे त्यांनी पहिल्यांदा उपदेश केला. त्यात लोकांना मध्यम मार्गाचा अवलंब करावा असा सल्ला त्यांनी दिला. दुःख, त्याची कारणे आणि त्याचे निवारण करण्यासाठी अष्टांगिक मार्ग अवलंबिण्यास त्यांनी सांगितले. अंहिसेचा पुरस्कार केला. यज्ञ, कर्मकांड, पशुबळी यांच्याविरोधात बोलले.

बौद्ध संप्रदाय-
बुद्धाच्या वेळी कोणताच संप्रदाय वा पंथ नव्हता. परंतु त्यानंतर मात्र मतभेद होऊन हिनयान व महायान हे पंथ तयार झाले. महायान म्हणजे मोठी नौका वा गाडी तर हिनयान म्हणजे छोटी गाडी वा नौका. महायान संप्रदायांतर्गतच वज्रयान नावाचीही एक उपशाखा होती. झेन, ताओ, शिंतो हेही बौद्ध धर्माचे संप्रदाय मानले जातात.

बुद्धाचे गुरू व शिष्य-
बुद्धाचे प्रमुख गुरू हे होते. – गुरु विश्वामित्र, अलारा, कलम, उद्दाका रामापुत्त आदी. बुद्धआचे शिष्य होते आनंद, अनिरुद्ध, महाकश्यप, राणी खेमा (महिला), महाप्रजापति (महिला), भद्रिका, भृगु, किम्बाल, देवदत्त, उपाली आदी. प्रमुख प्रचारक- अंगुलिमाल, मिलिंद (ग्रीस सम्राट), सम्राट अशोक, ह्वेन त्सांग, फा श्येन, ई जिंग, हे चो आदी.

बौद्ध धर्मग्रंथ-
बौद्ध धर्माची मूळ तत्वे ही आहेत- चार आर्य सत्ये, अष्टांगिक मार्ग, निर्वाण. बुद्धाने आपली शिकवण पाली भाषेत दिली. ती त्रिपिटीकामध्ये संकलित केली आहे. त्रिपिटक तीन भागात आहे. विनयपिटक, सुत्तपिटक व अभिधम्मपिटक. या पिटकांमध्येही अनेक उपग्रंथ आहेत. सुत्तपिटकमध्ये धम्मपदे आहेत. धम्मपदे लोकप्रिय आहेत.

बौद्ध तीर्थ-
लुंबिनी, बोधगया, सारनाथ व कुशीनगर ही चार प्रमुख बौद्ध तीर्थस्थळे आहेत. या ठिकाणी जगभरातील बौद्ध अनुयायी येत असतात. लुंबिनी नेपाळमध्ये आहे. बोधगया भारतात बिहारमध्ये तर सारनाथ उत्तर प्रदेशात काशीजवळ आहे. कुशीनगरही उत्तर प्रदेशात गोरखपूरजवळ आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..