उद्योगपती गोपीचंद हिंदुजा यांचा जन्म दि. २९ फेब्रुवारी १९४० रोजी झाला.
गोपीचंद हिंदुजा हे भारतात जन्मलेले ब्रिटीश अब्जाधीश उद्योगपती असून भारत आणि जगभरात कार्यरत हिंदुजा उद्योगसमूहाचे ते प्रमुख आहेत.त्यांचे शिक्षण जय हिंद कॉलेज, बॉम्बे येथे झाले.हिंदुजा समूहाची स्थापना १९१४ मध्ये परमानंद दीपचंद हिंदुजा यांनी केली होती.हिंदुजा समूह हा एक अँग्लो-इंडियन ट्रान्सनेशनल समूह आहे.हा समूह ऑटोमोटिव्ह,तेल आणि विशेष रसायने, बँकिंग आणि वित्त, आयटी आणि आयटीईएस, सायबर सुरक्षा, आरोग्य सेवा, व्यापार, पायाभूत सुविधा प्रकल्प विकास, मीडिया आणि मनोरंजन, उर्जा आणि स्थावर मालमत्ता यासह अकरा क्षेत्रांमध्ये उपस्थित आहे.हिंदुजा बंधूं या सर्व कामकाजाकडे लक्ष देतात. श्रीचंद हिंदुजा आणि गोपीचंद हिंदुजा हे दोघे भाऊ या ग्रुपचे चेयरमन आहेत.गोपीचंद हिंदुजा आणि कुटुंबाकडे १ लाख ७६, ५०० कोटी रुपयांची संपत्ती आहे.ते वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल अजेंडा कौन्सिलचे सदस्य आहेत आणि हिंदुजा फाउंडेशनचे विश्वस्त आहेत, जे भारत आणि जगभरातील अनेक धर्मादाय कार्यांना समर्थन देतात.गोपीचंद हिंदुजा यांचे लग्न सुनीता हिंदुजा यांच्याशी झाले आहे आणि त्यांना संजय हिंदुजा, धीरज हिंदुजा आणि रीता हिंदुजा अशी दोन मुले आणि एक मुलगी आहे. हिंदुजा कुटुंब हे सिंधी वारशाचे आहे.२०१५ मध्ये त्याचा मुलगा संजय हिंदुजा याने भारतातील उदयपूर येथे त्याची दीर्घकाळची मैत्रीण, डिझायनर अनु महतानीशी लग्न केले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply