नवीन लेखन...

मुलांमधील कर्करोग

निष्पाप निरागस कोणतेही व्यसन नसणारे बालक व किशोरवयीन मुलांना कर्करोग का व्हावा, त्यांना कोणते कर्करोग होतात असे प्रश्न मनात येतात. बहुधा लहान मुलांना रेटिनोब्लास्टोमा हा डोळ्याचा न्युरोब्लॉस्टोमा हा मेंदूचा विल्म ट्युमर हा किडनीचा, अस्थित होणारा ऑस्टिओब्लास्टोमा हा हाडाचा, लुकिमिया आमि लिंफोमा हा लिंफ उतीतील पेशींचा कर्करोग होतो.

यातील बरेच कर्करोग पेशीतील रंगसूत्रात बदल झाल्यामुळे होतात. गर्भाशयात भ्रुणाची वाढ होत असताना पेशी-विभाजन जलद गतीने होत. या क्रियेत रंगसूत्रांच्या रचनेत बदल होऊ शकतात व हे बदल दुरुस्त न झाल्यास कर्करोग होण्याची प्रक्रिया गर्भस्थितीत सुरू होते.

रेटिनोब्लास्टोमा या रोगाची सुरुवात एका गुणसूत्रातील काही भाग नाहीसा झाल्याने होतो. असे रंगसूत्र अपत्याला आई किंवा वडिलांकडून मिळाले असल्यास, मुलाच्या दोन्ही डोळ्यात कॅन्सर होतो. विल्मस ट्युमर हा आणखी एक प्रकारचा कर्करोग अगदी लहानपणी बाळाच्या पहिल्या दोन वर्षात होतो. याची सुरुवातसुद्धा गर्भाची वाढ होत असताना एका विशिष्ट गुणसूत्राचा काही भाग नाहीसा झाल्यामुळे होते. गुणसूत्रातील विकृती क्वचितप्रसंगी अनुवंशिकतेने येऊ शकते. असे झाल्यास दोन्ही मूत्रपिंडात विल्मस ट्युमर होतो.

मुलांना होणारा लिंफोमा या कर्करोगाचे निरीक्षण आफ्रिकेमध्ये बर्किट याने प्रथम केले. याची मोठी गाठ सहसा मानेवर दिसते. मुलांना होणाऱ्या कर्करोगात सर्वात जास्त प्रमाणात होणारा रोग म्हणजे ल्युकिमिया. यात वेगवेगळ्या तऱ्हेच्या पांढऱ्या रक्तपेशींची वाढ होते. ज्या विशिष्ट पेशींची संख्या वाढते. त्यानुसार ल्युकिमियाचे नामांकरण केले जाते. आता हा रोग समूळ बरा करण्यात यश मिळाले आहे. यासाठी अस्थिमज्जा रोपण या तंत्राचा वापर केला जातो. रोग्याच्या रोगप्रतिकारक यंत्रणेशी मिळती जुळती रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्ती किंवा नातलग बहुधा बहीण किंवा भावाच्या शरीरातून निरोगी अस्थिमज्जा बाहेर काढली जाते. रोग्याची अस्थिमज्जा पूर्णपणे नष्ट करून त्याऐवजी या निरोगी अस्थिमज्जेचे रोपण त्याच्या शरीरात करण्यात येते. दाता व निरोगी अस्थिमज्जा घेणारा रोगी या दोघांची रोगप्रतिकारक शक्ती समान असल्याने मज्जारोपणाची क्रिया यशस्वी होते. मज्जारोपणाच्या तंत्राने हजारो मुलांना पुनर्जन्म मिळाला असून ती समृद्ध जीवन जगताना दिसतात.

डॉ. रजनी भिसे
मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..