बातमी : कॅनबीज् (Cannabies)
संदर्भ : CNN, USA वरील १२ ऑगस्ट २०१६ ची बातमी.
• बातमी अशी आहे –
‘Canada allows patients to grow own canabies’.
• तुम्ही स्वत: कॅन्सर पेशंट अथवा केअर-गिव्हर असल्याशिवाय, आणि त्याचबरोबर तुम्हाला Alternate medicine बद्दल कांहीं माहिती असल्याशिवाय, या बातमीचें महत्व ध्यानात येणार नाहीं.
• ( आणखीही कांहीं व्याधींसाठी कॅनबीज् चा उपयोग होतो. तें आपण पुढे पाहूं ).
• कॅन्सरसाठी केमोथेरापी, रेसिएशन थेरापी यांचें नांव आपण ऐकलेलें असतें, पण आल्टनेटिव्ह थेरापीज् बद्दल आपल्याला फार माहिती नसते. Allopathy च्या व्यतिरिक्त ज्या ज्या अन्य थेरापीज् आहेत, त्या AlternateTherapies म्हटल्या जातात. या Head खाली बर्याच वेगवेगळ्या थेरापीज् येतात.
• आज आपण allopathy साठी मुख्यत्वें अमेरिकेकडे (USA) पाहतो. पण, दुर्दैवानें अमेरिकेत alterantive therapies ना quakary असें म्हणण्याची पद्धत गेली बरीच दशकें रूढ झालेली आहे. ( त्यापूर्वी तसें नव्हतें). हल्ली हल्ली तिथेंही आतां alternative therapy साठी अधिकृत संस्था निर्माण होऊं लागल्या आहेत. पण, they have a far way to go.
• अशा बर्याच alternative therapies आहेत, पण त्यांचे प्रॅक्टिशनर्स अमेरिकेत hound केले गेले, व त्यांनी मेक्सिको, बहामाज् असा देशांमधे आपली क्लिनिक्स् सुरूं केली.
• हा विषय फार मोठा आहे. त्याबद्दल नंतर केव्हांतरी.
• कॅनबीज् चा वापर हा असाच alternate therapy चा प्रकार आहे. cannabies चा संबंध आहे marujuana शी. तें तर एक नारकॉटिक ड्रग आहे. त्यामुळे, कॅनबीज् म्हटलें की लोक घाबरतात. मात्र, कॅनबीज् जर अल्प प्रमाणात, व expertct च्या मार्गदर्शनाप्रमाणें सेवन केल्या, तर त्यांचा कॅनरसाठी उपयोग होऊं शकतो, असें म्हणतात.
• पार्किन्सन्स साठी सुद्धा कॅनबीज् उपयुक्त आहेत, असें म्हणतात.
• USA मधील कांहीं स्टेटस् मधें (जसें की, कोलोराडो) कॅनबीज् कांहीं-अल्प प्रमाणात medicinal use साठी मिळतात.
• अणि, आतां कॅनडानें तर अशा वापरासाठी कॅनबीज् घरीं उगवायची परवानगी दिलेली आहे. Alternative therapy द्वारें असाध्य रोग बरा करण्यात, या सुधारणेचा नक्कीच उपतोग होईल.
• भारतात, आपण allopathgy व्यतिरिक्त बर्याच थेरापी वापरतो, जसें की आयुर्वेद, होमियोपॅथी, यूनानी, तिबेटियन (जें आयुर्वेद व चिनी मेडेसिनचें मिश्रण आहे), नेचरोपॅथी,
न्यूट्रिशन, सिद्ध-मेडिसिन. योगाचाही उपयोग आपण कांहीं व्याधींच्या निवारणार्थ करतो .
आतां तर भारतानें ‘आयुष’ मंत्रालय स्थापून या थेरापीज् ना चालना दिलेली आहे.
• पण, अजूनही, कॅनबीज् सारख्या गोष्टी इथें सहजासहजी मिळत नाहीत.
• मी माझ्या पत्नीच्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी कॅनबीज् च्या शोधात होतो. (केमोथेरापी व रेडिएशन थेरापीची उपयुक्तता संपलेली होती, व एका अन्य थेरापीसाठी पेशंटच्या अंगात पुरेसी शक्ती नसल्यानें ती सुरूं करतां आली नाहीं ).
• बराच शोध घेतल्यावर मी कॅनबीज् च्या सोर्सबद्दल माहिती मिळवूं शकलो. पण, त्यांचा ‘डोस’ सुरूं करण्यापूर्वीच पेशंटचें निधन झाले. मात्र त्यावेळी माझ्या एका फॅमिली-मेंबरची एका तरुण कॅन्सर पेशंटशी भेट झाली, जिला breast-cancer झालेला होया व जी कॅनबीज् चा डोस घेत होती. तिच्या म्हणण्याप्रमानें, तिची तोपर्यंत ६०% improvement झालेली होती.
• या पार्श्वभूमीवर, कॅनडामधे कां होईना, पण पेशंटला घरीं कॅनबीज् उगवायची परवानगी मिळालेली आहे, ही चांगली गोष्ट आहे. पुढेमागे भारतातही असा कांहीं, पेशंटस् च्या फायद्याचा कायदा येईल अशी आशा करायला हरकत नाहीं.
• मात्र, कुणा पेशंटला कॅनबीज् चा वापर करून पहायाचा असल्यास, त्यानें / तिनें ( व / किंवा केअरगिव्हरनें ) स्वत: या विषयाचा अभ्यास करून मगच त्याबद्दल निर्णय घ्याचा, असें माझें सांगणें आहे.
— सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
—————————————————————————
Disclaimer
Regarding Cancer- & Health-related News presented by Subhash S. Naik
Mr. Subhash S. Naik is not a physician. He has been a caregiver to his wife who was a cancer-patient, and who expired some time ago. Subhash S. Naik is merely collecting News & Information about Cancer-related & other relevant health-related matters from Print sources and /or electronic and / or other sources , and he is presenting it to the reader(s) with a belief that this collected information does not bear anybody’s copyright. In presenting this information, Subhash S. Naik is not expressing any personal opinion towards it. The readers should evaluate all the information themselves, and consult a physician &/ or any other expert as they deem necessary , and at their own responsibility, before putting this information to use.
—————————————————————————–
Leave a Reply