नवीन लेखन...

मुंबईतला १४० वर्षे जुना कॅपिटॉल सिनेमा

मुंबई! सात बेटांवर वसलेली सध्याची भव्यदिव्य नगरी! या नगरीची श्रीमंती दूरवर सर्वशृत आहे. ही जशी आर्थिक बाजूने भक्कम आहे तशीच मनोरंजन सृष्टीने बहरलेली आहे. कोणाला स्वप्नातही वाटलेलं नव्हतं की ही सात बेटं नंतर जगविख्यात बनतील आणि जर मनोरंजनसृष्टीच इथे आहे तर मग त्याला साजेशा किंबहुना मनोरंजनाकरिता असलेल्या खास वास्तू इथे नसतील असं कसं होईल?  इथे आजही अशा वास्तू आहेत ज्या शेकडो वर्षं जुन्या आहेत. त्या सध्या जरी बंद स्थितीत असल्या तरी त्या मुंबईकरांच्या मनात कायम राज्य करुन आहेत. थोडीथोडकी नाही पूर्ण १४० वर्षं जुनी असलेली वास्तू म्हणजेच “कॅपिटॉल सिनेमा” या वास्तूचं एक विशेष स्थान मुंबईकरांच्या मनात होतं, आजही आहे आणि भविष्यातही ते कायमच राहिल.

 

इतिहास :

या सिनेमागृहाचं सर्वप्रथम नाव “गॅटी थिएटर” (Gaiety Theatre) असं होतं. या वास्तूची स्थापना इ.स. १८७९ साली झालेली होती. त्यावेळी एक पारसी गृहस्थ या वास्तूचे मालक होते आणि त्यांचे नाव नाझिर होते. रंगमंचाची आकारमानता लांबीला ७० फूट व उंचीला ४० फूट इतकी होती. एकेकाळी या चित्रपटगृहात मराठी, गुजराती व इंग्रजी नाटकं होत असत. कालांतराने त्या वास्तूचे चित्रपटगृहात रुपांतर झाले. या चित्रपटगृहात सर्वात पहिला चित्रपट दाखवला गेला तो म्हणजे “The Wizard of OZ” जो की न्यूयॉर्कमध्ये २५ ऑगस्ट १९३९ रोजी प्रदर्शित करण्यात आला होता.

१९२९ साली हे थिएटर सिधवा नामक व्यक्तीने खरेदी केले. सिधवा हे कलकत्त्यामधील ग्लोब थिएटरचेही मालक होते. कालांतराने या थिएटरचं नाव “Capitol Cinema” असं ठेवण्यात आलं.

१८७० च्या दशकात बांधल्या गेलेल्या या वास्तूच्या बाह्यदर्शनी भागासाठी स्थानिकरित्या उपलब्ध असलेल्या राखाडी रंगाच्या बसाल्टमध्ये निओ – क्लासिक घटकांचा समावेश आहे. स्टेजच्या कमानीच्या आजूबाजूला घोड्याच्या नालेच्या आकारात बॉक्सेस बसवलेले आहेत.

सध्या ही वास्तू फक्त प्रशासकीय उद्देशाने वापरली जाणारी वास्तू म्हणून वापरली जाते. वेगाने वाढणार्‍या मल्टिप्लेक्स संस्कृतीमुळे दक्षिण मुंबईत असलेलंं जुन्या काळातील सर्वात मोठं चित्रपटगृह सध्या बंद करण्यात आलेलंं आहे. ही वास्तू सध्या १४० वर्षांची असूनही तितक्याच ताठ मानेने आपलं अस्तित्व दाखवत सर्वांसमक्ष उभी आहे.

पत्ता : छ. शिवाजी महाराज टर्मिनल्स समोर , मुंबई – ४००००१

— आदित्य दि. संभूस (कलाकार, दिग्दर्शक, लेखक) 

 

Avatar
About आदित्य संभूस 78 Articles
मराठी नाट्य चित्रपट कलाकार, दिग्दर्शक, लेखक...

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..