आरशात बघितलं की लगेचच आपण प्रथम केस ठिक करतो. बाजारात कॉस्मेटिक्सच्या उत्पादनांपैकी निम्म्याच्या आसपास उत्पादने केसांसाठी असतात. केसांच्या उत्पादनाच्या जाहिराती पेपर, टी.व्ही., वेबसाईट, होर्डिंग्ज अशा प्रकारच्या कितीतरी माध्यमातून बघायला मिळतात. अमुक तेल वापरलं तर तळ हातावर पण केस येतील अशा काही जाहिराती काही वर्षांपूर्वी पहाण्यात आल्या. थोड्याच दिवसांत त्या उत्पादनाची करोडोंची विक्री झाली पण लवकरच हवा गेली.
केसांसाठी मनुष्य काय काय करु शकतो, काय काय कमाऊ शकतो आणि काय काय गमाऊ शकतो ह्याची अनेक उदाहरणे देता येतील. अॅडव्होकेट रत्नपारखींची “शेपटा” ही कविता वाचली की लक्षात येईल की एस.एस.सी.ला बसलेल्या एकाचं आयुष्य शुभदा जोशीच्या केसांमुळे कसं उध्वस्थ झालं. तिच्या काळाभोर केसांचा शेपटा बघत अख्खा पेपर बिचार्याने कोरा ठेवला. अशी ही केसांची माहिती आहे. ह्या केसांबद्दल अधिक माहिती आयुर्वेदाच्या चष्म्यातून जाणून घेऊया.
केस म्हणजे काय
आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून केस हा हाडांचा मूळ आहे. हाडे चांगली सशक्त असतील तर केस चांगले राहतात. हाडांचा काही आजार झाला किंवा अपघातामुळे फ्रॅक्चर वगैरे झाल्यास केस भरपूर जायला लागतात असा अनेकांचा अनुभव आहे. हाडांचा आजार उपचार करुन ठीक झाल्यानंतर केसांची वाढ पुन्हा सुरु होते. शरीरात हाडांमध्ये वात दोष प्रामुख्याने असतो आणि वातासाठी सर्वात श्रेष्ठ औषध तेल आहे. अशा प्रकारे केसांचा आणि तेलाचा अप्रत्यक्ष संबंध आहे. केसांना नियमित तेल लावणार्यांचे पण केस गळून टक्कल पडते तर काहीजण आजिबात तेल लावत नाहीत तरीपण केस गळत नाहीत. याचे कारण म्हणजे हाडांचे आरोग्य. शरीरात एक दोष वाढला की तो दुसर्या दोषाला कमी करतो. केसांच्या बाबतीतही हा नियम लागू पडतो.
बायकांना टक्कल पडत का नाही
शंभरात ती क्के पुरुषांना टक्कल पडलेले दिसते. पण स्त्रियांमध्ये हे प्रमाण खूपच कमी आहे. केस गळतात अशी तक्रार बायका करततात खर्या पण गळतात तसे नवीन वाढ पण होते. म्हणून पूर्णपणे कॅरम बोर्ड झालेल्या बायका सहसा दिसत नाहीत. पाळीच्या माध्यमाने दर महिन्यात थोडे फार रक्त शरिरातून बाहेर जाते. त्यामुळे शरीरातील पित्त दोष छान प्रकारे नियंत्रणात ठेवण्याची निसर्गाची ही किमया आहे. ह्या उलट पुरुषांमध्ये टेस्टोस्टिरॉन नावाचे हार्मोन असते. हे हार्मोन उष्ण जातीचे असल्यामुळे आतल्या आत पित्त वाढवण्याचे कार्य करते. ह्या टेस्टोस्टिरॉन चे उत्पादन वाढले तर केस अधिकच गळतात. टेस्टोस्टिरॉन अधिक असल्यामुळे पुरुषांमध्ये कामशक्ती वाढते. म्हणूनच असे बघण्यात येते की टक्कल पडलेले पुरुष तुलनेने कामशक्ती मध्ये जरा अधिक सक्षम असतात. स्त्रियांमध्येपण हे हार्मोन असते पण अतिशय कमी प्रमाणात आढळते.केसांचे आजारकेस गळणे, कोंडा होणे, अणि अकाली पांढरे होणे हे मुख्यत: तीन आजार केसांच्या बाबतीत पहायला मिळतात. वास्तविक ह्यांना आजार म्हणावं का इथपासुनच सुरुवात करु या. डोक्यावरचे जवळपास १० टक्के केस हे सुप्त अवस्थेत असतात. ह्याला रेस्टिंग फेज असं म्हणतात ह्या रेस्टिंग फेजची जागा सतत बदलत असते. साधारण सहा महिने हे केस रेस्टिंग फेजमध्ये असतात. ह्या काळात त्या केसांना पोषण मिळत नाही आणि पुरेसे पोषण न मिळाल्यामुळे थोड्याशा ताणामुळे ते केस गळून पडतात. ह्या काळात इतर ९० टक्के भागात पोषण सुरु असते म्हणून एकीकडे केस वाढतात पण. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात केस गळणे हे नैसर्गिक आहे. त्याला आजार म्हणणे योग्य नाही. हे प्रमाण जर खूप जास्त असेल तर मात्र आजार समजला पाहिजे आणि त्याचे कारण शोधून मग इलाज केला पाहिजे. दुसरी तक्रार म्हणजे कोंडा होणे, कोंडा हा मुळात केसांचा आजार नसून केसांच
्या खालची त्वचा ह्या भागाचा आजार आहे. फंगस नामक जिवाणूंमुळे हा त्वचेचा आजार होतो. अकाली केस पांढरे होणे हा आजार म्हणावा का? हा पण एक समजून घेण्यासारखा विषय आहे. केसांचा मूळ रंग पांढराच असतो. किरेटिन नावाचा एक काळा प्रोटीन सदृश पदार्थ ह्या केसाला काळा बनवतो. वय वाढत गेल्यावर हे किरेटिन निर्माण करण्याची क्षमता कमी होत जाते आणि म्हणून केसांचा रंग पांढरा होऊ लागतो. कपडा जुना झाल्यावर जसा हळू हळू रंग फिका दिसू लागतो तसा हा प्रकार आहे.
केसांची काळजी कशी घ्यावी
केस गळणे, कोंडा होणे आणि अकाली पांढरे होणे अशा तीन गोष्टींसाठी काय उपाय करावा हे आता क्रमाक्रमाने बघुया. ह्या सर्वांचा विचार करतांना आहारातील काही घटकांचा परिणाम होतो का हे समजणे पण आवश्यक आहे. शरीरातील हाडा-मासांपासून तर नखा-केसांपर्यंत सर्व गोष्टी आपल्या आहारातूनच तयार होत असतात. त्यामध्ये काही कमी जास्त झाले तर शरीरातील घटकांमध्ये काहीतरी परिणाम दिसू लागतात, अर्थातच हे कोणत्यातरी अजाराच्या स्वरुपात दिसू लागते, केसांच्या बाबतीत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मीठ आहे. मीठ म्रहणजे केसांचा एक नंबरचा शत्रू आहे. ज्यांच्या खाण्यात मीठ थोडे वरचढ असते त्यांचे केस तुलनेने कमजोर असतात व गळू लागतात. म्हणून केसांची खरोखर काळजी घ्यायची असेल तर किंचित वरचढ पेक्षा किंचित कमी मीठ घेणे आवश्यक आहे. लोणची, पापड सारख्या पदार्थांमध्ये मुळातच मीठ भरपूर असते. त्यामुळे हे पदार्थ घेऊच नयेत. आहारात मीठ जास्त घेण्यामुळे केस गळणे आणि अकाली पांढरे होणे वाढते. वंश शास्त्राच्या दृष्टीने केस वडिलांकडून येतात. त्यामुळे अनुवंशिकतेचा विचार केला तर वडिलांचे केस विशिष्ट वयात गळू लागले तर मुलांचे पण त्याच वयात गळणे सुरु होऊ शकते. ट्रीटमेंटचा विचार करताना केसांसाठी तेल आणि शांपू ह्याशिवाय काही उपचार अस
शकतो असे सर्वसामान्यांच्या मनातही येत नाही. ह्याचे मुख्य कारण आहे जाहिराती. शांपू व तेलांच्या
इतक्या जाहिराती रोज बघायला मिळतात की नेमकं काय चांगलं
आहे हे कळेनासं होतं. ज्या तेलांमध्ये परफ्यूम आहे असे तेल केसांना चांगले नाही असा एक सामान्य नियम लक्षात ठेवावा. बरेच लोक विचारतात “शांपू कोणता चांगाल?” मुळात शांपूचा उपयोग काय हे लक्षात ठेवले पाहिजे. शांपू हा केस धुण्यासाठी वापरला जाणारा साबणासारखा पदार्थ आहे. फेस झाल्यामुळे केसामधील तेलकट भाग त्यात विरघळला जातो आणि पाण्याने धुवून टाकला जातो. शांपूचा संपर्क केसांशी फक्त अर्धा मिनिट असतो. तेवढ्या थोड्या वेळात त्याचा कोंड्याशी काय म्हणून संपर्क होणार? कोंडा हा एक त्वचा रोग आहे, आणि त्वचारोगावर इलाज करायचा असेल तर जे काही औषध त्वचेवर लावाल ते निदान तासभर तरि तेथे राहिले पाहिजे. काही सेकंदात धुण्यामुळे शांपूचा परिणाम फक्त कोंडा वाहून नेण्यासाठी होऊ शकतो. कोंडा निर्माण होण्याची क्रिया त्याबे थांबू शकत नाही. आजकल हर्बल शांपू फार दिसू लागले आहेत. ह्या हर्बल शांपूमध्ये फक्त वनस्पतींचा ०.०१ टक्का अर्क असतो बाकी सर्व केमिकल्स असतात. केमिकल्स म्हणून हे वाईट असे माझे म्हणणे नाही परंतु हर्बल म्हणण्यासारखे त्यात खरोखर काही आहे का ते म्हणजे त्याच्या PH मध्ये. शांपू हा अॅसिडिक किंवा अल्कलाईन नसावा, तो न्युट्रल असावा हे सर्वात महत्वाचे आहे. केसांसाठी तेल आवश्यक आहे हे खरे आहे पण ते केवळ वर वर लावून उपयोगी नाही. आयुर्वेदाच्या सांगण्यानुसार तेल नाकात टाकावे म्हणजे त्याचा परिणाम मुळापर्यंत होतो. झाडांच्या पानांवर पाणी किंवा खत शिंपडून उपयोग नाही तर ते पोषक घटक झाडाच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे. केसांच्या बाबतीतही हाच नियम लागू आहे. नाकात नेमके कोणते तेल टाकावे हे पण प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार आणि ल
्षणांनुसार ठरते. सरसकट सर्वांसाठी एकच तेल उपयोगी नाही. पुढचा महत्वाचा भाग आहे पोटातून औषध घेण्याचा. केसांना पोषण मिळते आपल्या आहारतूनच त्याचप्रमाणे आहारात काही घटक कमी पडत असतील तर केसांच्या गळण्याला निमित्त होऊ शकते. हे लक्षात घेऊन आयुर्वेदात गुळवेल, मका, ब्राम्ही, गोखरु, मंडूर, कासीस अशा घटकांचा उपयोग पोटात घेण्यासाठी करावा. चाळीशीच्या आतल्या वयात ह्या घटकांच्या गोळ्या पोटात घेतल्या की अगदी जादू केल्यासारखे ५-६ दिवसांत फरक पडतो. साधारण दोन ते तीन महिन्यांत केसांची लक्षणीय वाढ दिसून येते. नंतर ही औषध योजना १५ ते २० दिवस बंद करुन पुन्हा २-३ महिने चालू करावी. एकच एक औषध सतत चालू ठेवण्यामुळे शरीर प्रतिसाद देणे बंद करते. म्हणून ही गॅप ठेवावी.
थोडक्यात महत्वाचे मुद्दे –
१) शांपू कोणताही वापरा, त्याचा pH न्युट्रल असणे महत्वाचे आहे. २) शांपू ने डॅंड्रफ (कोंडा) फक्त धुतला जातो, निर्माण होणे थांबत नाही.३) केसांची वाढ होण्यासाठी नाकात तेल टाकावे, नुसते चोपडून उपयोग नाही. ४) खर्या अर्थाने वाढ होण्यासाठी पोटातून औषध घेणे आवश्यक आहे. ५) मधुनच रक्तदान केल्यास पित्त कमी होऊन केस गळणे कमी होते. ६) अनुवंशिकतेमुळे केस गळणे / पांढरे होणे, आहार व औषधांनी आटोक्यात आणता येते. ७) केमोथेरपीमुळे केस गळत असतील तर आवळ्याचा रस प्यावा.
लेखक – डॉ. संतोष जळूकर (मुंबई)
santoshjalukar@rediffmail.com
Tel. : 9969106404
खूप छान सर पण केस विचारताना अंघोळ करताना गळण्याचे प्रमाण वाढले तर काय उपाय करावा