सर्वसाधारणपणे अमेरिकेत, किंवा एकूणच परदेशात जाऊन आलेली मंडळी तिकडच्या शहरांविषयीच बोलतात, लिहितात. प्रवासवर्णनेही शहरकेंद्रित असतात. कदाचित पर्यटक म्हणून गेल्यावर शहरातच फिरणे जास्त होत असेल किंवा गावांमध्ये काय बघायचे अशी भावना असेल. या पुस्तकाचं वेगळेपण इथेच आहे.
अमेरिकेत दहा वर्षाहून जास्त काळ ग्रामीण भागात वास्तव्य करणार्या डॉ.संजीव चौबळ यांनी तिथल्या ग्रामीण जीवनाचं सुंदरसं चित्र आपल्यासमोर उभं केलेलं आहे.
अन्नाच्या बाबतीत स्वयंपूर्णता ही कोणत्याही देशाच्या सरकारची प्राथमिक स्वरूपाची जबाबदारी असते. १९३० आणि १९४० च्या दशकामधले अमेरिकन सरकारचे कृषी विषयक धोरण हे शेतकरी धार्जिणे होते. त्यामुळे बहुसंख्य शेतकर्यांना शेतीवर उपजीवीका करून, संपूर्ण देशाला पुरेसे अन्न उत्पादन करण्यासाठी अनुकुल अशा योजना राबवल्या जात होत्या. शेती हे एक उपजीविकेचे महत्वाचे साधन असल्यामुळे, छोटे छोटे शेतकरी देखील स्वत:च्या जमिनीवर […]
विसाव्या शतकामधे अमेरिकन शेती व्यवसाय आणि एकंदरीतच ग्रामीण जीवनात आमूलाग्र बदल झाले आहेत. विसाव्या शतकाच्या सुरवातीस अमेरिकेची एकूण लोकसंख्या होती ७६ दशलक्ष. या पैकी निम्याहून अधिक वस्ती ही ग्रामीण भागातच एकवटलेली होती. त्यावेळी शेती व्यवसाय हा प्रामुख्याने, प्रचंड मोठ्या संख्येने असलेल्या लहान लहान फार्म्सवर व्हायचा. (अमेरिकन शेतीच्या संदर्भात, ‘फार्मिंग’ ही संज्ञा किंवा संकल्पना लवचिकपणे वापरायची आहे. […]
काऊंटी फेअर्स सन १८०० च्या सुमारास शेतकी जत्रांमधून खेडयापाडयातील लोकांना नवीन शेतकी तंत्रज्ञान, साधनं, पिकांच्या आणि जनावरांच्या जाती – उपजाती बघण्याची संधी मिळायची. १९ व्या शतकात, या जत्रांमधे इतर शैक्षणिक, स्पर्धात्मक, सामाजिक तसंच करमणुकीच्या गोष्टींचा समावेश होत गेला. त्या नंतर केवळ काही पिढयांमध्ये, जिल्हा आणि राज्य स्तरावरच्या शेतकी जत्रा, ही पूर्णांशाने एक अमेरिकन पध्दत / रीतिरिवाज […]
शाळा कॉलेज मधील विद्यार्थ्यांसाठी शेती संदर्भातील प्रकल्प 4-H : या प्रकल्पाची सुरुवात २० व्या शतकाच्या सुरवातीला, अमेरिकेच्या विविध राज्यांमधे साधारणपणे एकाच वेळी झाली. या मागचा उद्देश, public schools मधलं शिक्षण अधिकाधिक प्रात्यक्षिक आणि व्यावहारिक स्वरूपाचं व्हावं आणि एकंदर शिक्षणाची ग्रामीण भागाशी योग्य सांगड घातली जावी, असा होता. वर उल्लेखलेल्या Land Grant Universities ची सुरुवात होऊन ३०-४० […]
लॅंड ग्रॅंट युनिव्हर्सिटीज आणि शेती विस्तार कार्यक्रम (Agriculture Extension Programme) अमेरिकेत, लॅंड ग्रॅंट युनिव्हर्सिटीज (जमिनीच्या अनुदानावर आधारित कृषी विश्वविद्यापीठे), ह्या उच्च शिक्षणाच्या मोठया प्रसिद्ध संस्था आहेत. ह्या संस्थांना चांगली शे-दिडशे वर्षांची उच्च शिक्षणाची परंपरा आहे. तसं पाहिलं तर शिक्षण आणि संशोधन (education and research) ही महत्त्वाची अंगे असलेल्या अनेक नामांकित संस्था असतात. परंतु लॅंड ग्रॅंट युनिव्हर्सिटीजनी […]
अमेरिकन शेतीच्या प्रगतितील ठळक टप्पे १९ व्या शतकातील प्रगती – मनुष्यबळ ते अश्वशक्ती – शेती हा नेहमीच एक कष्टाचा उद्योग राहिला आहे. जमिनीची मशागत, पेरणी, तण काढणे, पिकाला पाणी देणे, पिकाचे रक्षण करणे, तयार झालेले पीक काढणे, धान्य साठवणॆ किंवा धान्य बाजारात नेण्यासाठी तजवीज करणे, एक ना दोन, हजार गोष्टी. १९ व्या शतकातलं अमेरिकेतलं महत्वाचं पीक […]
कोलंबसने १४९२ साली अमेरिकेचा मार्ग शोधल्यापासून, युरोपमधे या नवीन जगाविषयीचे कुतूहल चाळवले गेले होते. युरोपातल्या त्या काळच्या धार्मिक आणि सरंजामशाही वातावरणाला सामान्य जनता विटली होती. कर्मठ परंपरांनी धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी झाली होती. सरंजामशाहीमुळे, मुठभर गर्भश्रीमंतांच्या हातात सार्या जमिनीची मालकी एकवटली होती आणि उरलेली जनता कष्टाच्या व दारिद्र्याच्या ओझ्याखाली पिचत होती. त्यामुळे एका सर्वस्वी नव्या अशा जगाचे […]
भारत आणि अमेरिका दोन्हीही खंडप्राय देश. शेती हा दोघांच्याही सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेचा महत्वाचा घटक. फार खोलात न जाता, किंवा रुक्ष आणि किचकट आकडेवारी सादर न करता, या दोन देशांतल्या शेतीची ढोबळ तुलना आणि त्यानंतर थोडा अमेरिकन शेतीचा इतिहास सांगण्याचा हा प्रयत्न आहे. अमेरिकेचं क्षेत्रफळ (२२,६४० लाख एकर), भारताच्या क्षेत्रफळाच्या (८,२०० लाख एकर) साधारणपणे तिप्पट आहे. […]
माझा जायचा यायचा रस्ता पूर्व पश्चिम असा आहे. डोंगरातून जाणारा रस्ता असल्यामुळे, काही ठिकाणी रस्ता छोट्या छोट्या खिंडींमधून जातो. त्यामुळे खिंडीची एक भिंत उत्तराभिमुख असते तर दुसरी दक्षिणाभिमुख. हे ठिकाण बरेच उत्तरेला असल्यामुळे हिवाळ्यामधे सूर्य नेहमी दक्षिण दिशेलाच दिसत असतो. त्यामुळे बरेचदा सूर्यप्रकाश पडला, की दक्षिणाभिमुख भिंतीवरचे बर्फ वितळून जाते, तर उत्तराभिमुख भिंतीवर सूर्यकिरणे न पडल्यामुळे, […]
नोव्हेंबर डिसेंबरमधे कधी तरी हिमवृष्टी सुरू होते. गाडी चालवताना जर हिमवृष्टी होत असेल, तर काचेवर येणारे हे हिमकण, जणू आकाशातून अलगद उतरत येत असतात. गाडीच्या बाजूच्या काचेतून हिमकणांचा वर्षाव बघत रहावा. गाडीच्या वेगाप्रमाणे यांचा देखील वेग बदलल्या सारखा वाटतो. एरवी अलगदपणे उतरणारे हे हिमकण, गाडी वेगात जात असली म्हणजे पावसाच्या सपकार्यासारखे जोरात येऊ लागतात. सारा आसमंत […]