सर्वसाधारणपणे अमेरिकेत, किंवा एकूणच परदेशात जाऊन आलेली मंडळी तिकडच्या शहरांविषयीच बोलतात, लिहितात. प्रवासवर्णनेही शहरकेंद्रित असतात. कदाचित पर्यटक म्हणून गेल्यावर शहरातच फिरणे जास्त होत असेल किंवा गावांमध्ये काय बघायचे अशी भावना असेल. या पुस्तकाचं वेगळेपण इथेच आहे.
अमेरिकेत दहा वर्षाहून जास्त काळ ग्रामीण भागात वास्तव्य करणार्या डॉ.संजीव चौबळ यांनी तिथल्या ग्रामीण जीवनाचं सुंदरसं चित्र आपल्यासमोर उभं केलेलं आहे.
ऑक्टोबरपासून थंडी वाढायला लागते. या सुमारास धुकं देखील खूप पडायला लागतं. धुक्याच्या आवरणातून जवळची झाडं तेवढी दिसत असतात; तर लांबच्या टेकड्या, झाडं धुक्यात गुरफटून गेलेली असतात. त्यातून दुरच्या झाडांचे नुसते शेंडेच दिसत असतात. आसपासच्या दर्यांतून धुक्याच्या लाटा उठत येतात. एखादा तलम दुपट्टा वार्यावर तरंगत जावा तसं धुकं वार्यावर लहरत जातं. फॉल मधल्या धुक्याची मजा काही औरच […]
आजूबाजूंच्या घरांपुढच्या हिरव्या गर्द हिरवळीवर रंगी बेरंगी सुकलेली पानं पडायला लागतात. रस्त्यांवरची सुकलेली पानं, येणार्या जाणार्या गाड्यांमुळे इतस्तत: ढकलली जातात. छोट्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूंची झाडं रंगी बेरंगी पानांनी भरून गेली की जणू रंगीत पताका आणि कमानींनी रस्ते सजवल्यासारखे दिसायला लागतात. थोड्याच दिवसात पडलेल्या पानांची संख्या एवढी वाढते, की रस्त्याच्या कडेला सुकलेल्या पानांच्या किनारी तयार होतात. जिथे […]
थंड प्रदेशातले लोक उन्हाचं एवढं कौतुक का करतात ते आपल्याला उन्हाळ्यात लक्षात येतं. एखाद्या पूर्ण उन्हाळी दिवशीं, लख्ख प्रकाशाने सारा आसमंत उजळून निघालेला असतो. आकाशाची निळाई झळकत असते. ढगांच्या शुभ्र पताका पावित्र्याचा जयघोष करत आकाशात फडकत असतात. डोंगरांच्या, टेकड्यांच्या रांगा, निळाईच्या वेगवेगळ्या छटा अंगावर वागवत, लाटांप्रमाणे एकामागोमाग एक उठत असतात. गवताच्या टेकड्यांचा हिरवा रंग चोहोबाजूंनी लपेटून […]
सारा उंचसखल भाग असल्यामुळे ठिकठिकाणहून वहात येणार्या पाण्याने रस्त्याच्या दोहोबाजूस ओहोळ झालेले असतात. ते पाणी वाहून, बर्याच ठिकाणी रस्त्याची सोबत करत, दोन्ही बाजूंना खोलगट पन्हाळी तयार झालेल्या असतात. पावसात त्यातून डोंगरावरचे तांबडे मातकट पाणी वहात असते. इतर वेळेला पन्हाळीत ओल टिकून रहाते. त्या ओल्या मातीत, गवताच्या साथीनं रामबाण उगवलेले असतात. रंगीबेरंगी फुलं, गवताची डुलणारी पाती, रामबाणाचे […]
पाऊस जणू आपल्या बरोबर हिरव्या रंगाचे डबे घेऊन येतो आणि रानावनात ओतत राहतो. रानांत पाचूचा चुरा उधळावा तसं कोवळ्या पानांनी फुललेलं रान सजू लागतं. ठिपक्यां एवढी पानं कले कलेने वाढत, रुपयाच्या नाण्याएवढी, वाटीएवढी किंवा हाताच्या पंजापेक्षा मोठी होत जातात. जमिनीवर हिरव्या गवताचं साम्राज्य पसरतं तस तसे, वाढणार्या हिरव्या गवतात आधीच्या वर्षात गळून पडलेली सुकलेली पानं, काटक्या, […]
पेनसिल्वेनीयातल्या पोकोनो पर्वतराजीतून जाणार्या, “माझ्या” यु.एस. रुट नंबर ६ वर, तीन वर्षे ये जा करता करता, नजरेस पडलेले निसर्गाचे ऋतुचक्र. मार्चच्या अखेरी पासून ते एप्रिलच्या सुरुवाती पर्यंत वसंताची चाहूल लागायला लागते. साठलेले बर्फाचे ढीग वितळून पाण्याचे छोटे छोटे ओहोळ उतारावरून रस्त्याच्या कडेने वाहू लागलेले असतात. बर्फाने आच्छादलेली जमीन उघडी वागडी व्हायला लागलेली असते. सुकलेल्या पाचोळ्याचा तपकिरी […]
इथे हरणं खूप. रस्त्याच्या कडेला, मोटारींच्या धडकेने मरून पडलेली हरणं हे तर कायमच दिसणारं दृश्य. संध्याकाळी, रात्री गाडी चालवताना त्यांचं भान ठेवावं लागतं. बहुतेक सारा रस्ता दाट झाडीतून आणि माळरानांतून जाणारा. त्याला काही ठिकाणी रस्त्याच्या कडेचं कुंपण, पण बराचसा भाग कुंपणाशिवायचा. त्यामुळे हरणांना रस्त्त्यावर यायला काहीच अडचण नसते. संध्याकाळच्या उतरत्या उन्हात, एखाद्या टेकडीच्या उतारावर, चार-पाच हरणांचा […]
या भागातल्या यु.एस.रूट नंबर ६ वर वाहतूक देखील तशी तुरळकच. ट्रॅफिक जॅम वगैरे प्रकार नाही. सारा प्रदेशच डोंगराळ असल्यामुळे, दगडांच्या खाणी खूप. रस्त्याच्या बाजूला, दोन-चार ठिकाणी, मोठ्या जागेमध्ये, फोडलेल्या दगडांच्या ओबडधोबड लाद्या हारीने रचून ठेवलेल्या दिसतात. झाडांची वानवा नसल्यामुळे वृक्षतोड देखील भरपूर चालते. पण ती सारी आत चालत असावी, कारण रस्त्यावरून जातांना तशी काही कल्पना येत […]
हा ३० मैलांचा रस्ता बहुतांशी ग्रामीण भागातून जातो. फारशी कुठे सपाटी नाही. सगळा उंच सखल, टेकड्या दर्यांचा प्रदेश. छोटेखानी डोंगरांच्या, गर्द झाडीने भरलेल्या रांगांच रांगा. रस्ता सगळा घाटाच्या वळणाचा. रस्त्याला समांतर अशी सस्कुहाना नदी वाहते. ही वरती न्यूयॉर्क राज्यातून येऊन पेनसिल्व्हेनीयातून वाहत जाते. टेकड्यांच्या अधून मधून जातांना, काही वेळा ती यु.एस. रूट नंबर ६ ला बिलगून […]
आम्ही राहतो ते “क्लार्क्स समीट” हे गाव पेनसिल्व्हेनीयाच्या ईशान्य कोपर्यात येतं. पेनसिल्व्हेनीयाचा हा भाग खूप डोंगराळ आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. ह्या भागातल्या डोंगरांच्या रांगांचं नाव “पोकोनो”. हा “अॅपलाचियन” पर्वतराजीचा एक भाग आहे. अॅपलाचियन ही काही एक सलग पर्वतराजी नाही. त्यात बर्याच छोट्या मोठ्या पर्वतरांगा समाविष्ट आहेत. ही पर्वतराजी कॅनडाच्या आग्नेय भागातल्या न्यू फाउंडलंड भागातून सुरू […]