सर्वसाधारणपणे अमेरिकेत, किंवा एकूणच परदेशात जाऊन आलेली मंडळी तिकडच्या शहरांविषयीच बोलतात, लिहितात. प्रवासवर्णनेही शहरकेंद्रित असतात. कदाचित पर्यटक म्हणून गेल्यावर शहरातच फिरणे जास्त होत असेल किंवा गावांमध्ये काय बघायचे अशी भावना असेल. या पुस्तकाचं वेगळेपण इथेच आहे.
अमेरिकेत दहा वर्षाहून जास्त काळ ग्रामीण भागात वास्तव्य करणार्या डॉ.संजीव चौबळ यांनी तिथल्या ग्रामीण जीवनाचं सुंदरसं चित्र आपल्यासमोर उभं केलेलं आहे.
यु.एस. रूट नंबर ६ हा अमेरिकेतील एक प्रसिद्ध रस्ता! मॅसेच्युसेट्स राज्यातल्या केपकॉड पासून ते कॅलिफोर्नियातल्या लॉंग बीच पर्यंत जाणारा. अटलांटिक आणि पॅसिफिक अशा दोन महासागरांना जोडणारा. ५१५८ कि.मी. (३२०५ मैल) लांबीचा आणि १४ राज्यांतून जाणारा. खर्या अर्थाने देशव्यापी किंवा खंडव्यापी असा रस्ता! (तुलनाच करायची झाली तर, भारतातील सर्वात मोठा हायवे, म्हणजे नॅशनल हायवे नंबर ७. हा […]
थंडीच्या मोसमात गायींना आत बंदिस्त लाकडी गोठयांमधे घेत असतील, अशी माझी समजूत होती. पण पहिला हिमवर्षाव झाला आणि फार्मच्या जवळून जाताना बघितलं तर सार्या गायी नेहमीसारख्या बाहेर उभ्या! त्यांच्या काळ्याभोर पाठींवर, पांढर्याशुभ्र बर्फाच्या झुली उन्हात चमकत होत्या. बर्फाचं, थंडीचं त्यांना काही विशेष अप्रूप असावं असं वाटत नव्हतं. पुढे पुढे मग या दृष्याचीही सवय झाली. फूटफूटभर साचलेल्या […]
मे ते सप्टेंबर पर्यंत शेतं, मक्याच्या आणि सोयाबीनच्या पिकांनी हिरवीगार झालेली असायची. मक्याची रोपं तर चांगली १०-१२ फूटांवर पोहोचणारी. कच्च्या रस्त्यावरून गाडीने जाताना, रस्याच्या दोन्ही बाजूंची वाढलेली रोपं गाडीच्या उंचीच्या वर पोहोचायची. त्यामुळे उभे आडवे रस्ते मिळणार्या कोपर्यांवर, आडव्या रस्त्यावरून येणार्या गाडया दिसत नसत, त्यामुळे आडवा रस्ता आला की गाडीचा वेग हळू करायचा, डाव्या उजव्या बाजूला […]
सुरवातीला वर्षभर आम्ही गावातल्या घरात रहात होतो. मग माझं संशोधन प्रकल्पाचं काम जसं वाढलं आणि संध्याकाळी उशीरा किंवा शनिवार रविवारी देखील जसं काम सुरू झालं, तसं आम्ही कंपनीच्या जुन्या फार्महाऊसवर रहायला गेलो. हे फार्महाऊस साधारणपणे सत्तर वर्षांचं जुनं आणि फारसं निगराणी न राखलेलं होतं. त्याचा उपयोग केवळ आमच्यासारखे काही काळापुरते येऊन प्रकल्पाचे काम करणारे किंवा फार्मवर […]
सू सेंटरला आल्यावर काही दिवसांतच आम्हाला एक अपार्टमेंट भाड्याने रहायला मिळालं, ते गावातल्या रहिवासी (residential) भागात. मिडवेस्टमधल्या एका छोट्याशा गावात, १०० टक्के जुन्या वळणाच्या अमेरिकन पद्धतीशी आणि जाज्वल्य अशा ख्रिश्चन विचारसरणीशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात, आमचे दिवस चालले होते. आमची कंपनी गायींमधे कृत्रिम गर्भारोपण आणि तत्सम विषयांमधे काम करणारी असल्यामुळे, ऑफिस, लॅब वगैरे सर्व एका मोठया फार्मवरच […]
सुपीक जमीन. त्यातून वहाणार्या मिसुरी आणि मिसीसीपी सारख्या प्रचंड नद्या. आपल्या गंगा यमुना पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात तर मिसुरी आणि मिसीसीपी उत्तरेकडून दक्षिणेकडे. आपल्या गंगा यमुनांचा संगम अलाहाबादला तर मिसुरी-मिसीसीपीचा संगम सेंट लुईसला. त्या शिवाय इतर अनेक छोट्या मोठ्या नद्या. त्यामुळे सारा प्रदेश सुपीक आणि समृद्ध. जसजशी अमेरिकेची वस्ती वाढू लागली आणि पश्चिमेकडे सरकू लागली तसतसा हा […]
अमेरिकेत तसं रेल्वेचे जाळं खूपंच मोठं आहे. ‘बाल्टीमोर ऍंड ओहायो’ या कंपनीने पहिली रेल्वे सेवा १८३० साली मेरीलॅंड राज्यामधे सुरू केली. १८६० सालापर्यंत सुमारे ३०,००० मैल लांबीचं रेल्वे लाईन्सचं जाळं निर्माण झालं होतं. परंतु तोपर्यंत अमेरिकेत पश्चिमेकडे विस्तार मोठया प्रमाणावर सुरू झाला नव्हता, आणि त्यामुळे बहुतेक सार्या रेल्वे सेवा, मिसीसीपी नदीच्या पूर्वेकडेच एकवटल्या होत्या. पुढच्या ४०-५० […]
माझ्या युनिव्हर्सिटी पासून, सू सेंटर १६०० मैलांवर होते. अमेरिकेत राहिलेल्या आणि रुळलेल्या लोकांच्या दृष्टीने, हा म्हणजे कारने दोन किंवा तीन दिवसांचा प्रवास. पण त्यावेळी माझ्याकडे गाडी नव्हती, त्यामुळे मी विमानाने जाणार होतो. अर्थात सू सेंटर हे अगदीच छोटं गाव असल्यामुळे तिथं जायला थेट विमानसेवा उपलब्ध नव्हती. सू सेंटरपासून साधारण तासाभराच्या अंतरावर सू सिटी हे ६५,००० लोकवस्तीचं […]
मी पेशाने पशुवैद्यक (Veterinary doctor) आहे. मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून १९८६ साली, ‘पशुप्रजनन’ शास्त्रामधे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून, बरीच वर्षं गुजरातमधे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (NDDB) ह्या प्रसिद्ध संस्थेच्या, ‘गाई म्हशींमधे कृत्रिम गर्भारोपण’ (Embryo Transfer), ह्या प्रकल्पावर डेप्युटी मॅनेजर म्हणून काम करत होतो. परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याची मनापासून इच्छा होती, पण प्रयत्न करूनही योग जमत नव्हता. […]
पुढे मुंबईलाच परळच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात (Bombay Veterinary College) १९८० ते १९८४ मधे पशुवैद्यक पदवी शिक्षण पूर्ण केले. या पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे वैशिष्ठ्य म्हणजे हे एशिया खंडातले सर्वात जुने (१८८६ साली ब्रिटीशांनी सुरु केलेले) पशुवैद्यकीय महाविद्यालय. त्याला जोडूनच असलेले सुसज्ज पशु इस्पितळ. जुन्या दगडी इमारती आणि भरपूर झाडीने भरलेल्या या महाविद्यालयाच्या प्रांगणामधे (Campus) आल्यावर आपण मुंबईत आहोत यावर […]