नवीन लेखन...

छंद

लेखक – चंदन विचारे

प्रसिद्ध लेखक व पु काळे त्यांच्या वपुर्झा या पुस्तकात असं म्हणतात कि , माणसाला काही ना काही छंद हवा. स्वप्नं हवीत. पुरी होणारी किंवा कायम अपुरी राहणारी. त्यातून तो स्वतःला हरवायला शिकतो. सापडायला शिकतो. हे ‘हरवणं-सापडणं’ प्रत्येकाचं निराळं असतं.

अशी बरीच स्वप्नं आपल्यापैकी सारेच शेकड्यानी दिवसा – रात्री, झोपेत – जागेपणी , चालता- बोलता पहात असतो. त्यातील फार थोडी थोडकिच मंडळी ती नुसती पहात नाहीत तर ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी झगडतात. दिवस रात्र अपार मेहनत घेऊन ती स्वप्ने प्रत्यक्षात उतरवतात. तर काही वेळेअभावी वा इतर कारणांमुळे अपूर्णच रहातात.

स्वप्नं आणि छंद दोन्ही मनाला पिसे लावतात. वेडावून सोडतात, एक वेगळं जग एक वेगळं आयुष्य आपल्यासमोर आणून उभे करतात. या दोघांविषयी बोलू तितके कमीच आहे .

सध्यातरी आपण छंदांविषयी बोलू. या जगतात प्रत्येकाला काही ना काही छंद हा असतो. चांगला वाईट हे ज्याचं त्याने ठरवावं. पण हे छंदच असतात जे तुमच्या जगण्याला बळ देतात.

कुणाला कोर्या कॕन्हवासवर चित्रे रेखाटण्याचा, कुणाला कविता – चारोळ्या करण्याचा, कुणाला लिखाणाचा, कुणाला गाण्याचा वा गाणी ऐकण्याचा, कुणाला गोष्टी सांगण्याचा वा गोष्टी ऐकण्याचा, कुणाला टपालाची तिकिटे तर कुणाला बसची तिकिटे जमविण्याचा, कुणाला मनसोक्त भटकंतीचा, कुणाला दरवेळी वेगवेगळे नवनविन खाद्यपदार्थ खाण्याचा वा बनवून इतरांना खाऊ घालण्याचा. कुणाला आपल्या कमेर्‍यातून निसर्गाची, सजीव निर्जिवांची विविध रंगी रूपे टिपण्याचा. कुणाला जुनी – दुर्मिळ कागदपत्रे, चित्रे जमविण्याचा ती अभ्यासण्याचा, कुणाला इतिहास संकलनाचा, संशोधनाचा, कुणाला जुनी नवी नाणी जमविण्याचा तर कुणाला दगडी जमविण्याचा, कुणाला ऐतिहासिक शस्त्रे संग्रहाचा , कुणाला जुनी पितळेची तांब्याची , चांदिची भांडी जमविण्याचा , कुणाला पुस्तके वाचण्याचा , कुणाला जुने वाडे , जुनी मंदिरे , लेणी , शिल्पे अभ्यासण्याचा छंद असतो.

हे आणि असे बरेच नानाविध छंद अनेकजण जोपासतात अन् त्याच छंदांना आपल्या जगण्याचं , उत्पन्नाचं साधन बनवतात.

जो छंद आपण जोपासतोय त्याच क्षेत्रात काहीतरी करायला मिळणं याहून सुंदर अनुभव, समाधान आणि आनंद दुसरा कुठलाच नाही.

हे छंदच असतात जे आपल्याला जगायला शिकवतात, जिंकायला शिकवतात, कर्तृत्वाच्या आभाळात उंचच उंच भरारी घ्यायला शिकवतात.

हे छंदच असतात जे आपल्या मनाला आलेली मरगळ दूर करतात.

हे छंदच असतात जे आपल्या दुःखातून बाहेर पडण्यास मदत करतात.

हे छंदच असतात जे आपल्याला मानसिक ताणतणावापासून दूर नेतात.

हे छंदच असतात जे जनमानसात आपली स्वतःची अशी एक वेगळी ओळख , वेगळी प्रतिमा निर्माण करतात.

हे छंदच असतात जे आपल्याला व्यक्त होण्याइतपत, आपली मते ठामपणे मांडण्याइतपत लायक बनवतात.

हे छंदच असतात जे आपल्याला समृद्ध , प्रगल्भ,विचारवंत बनवतात.

हे छंदच असतात जे तुम्हाला एक वेगळा दृष्टिकोन देतात, वेगळा विचार करायला , व्यक्त व्हायला प्रवृत्त करतात.

हे छंदच असतात जे तुमच्या आत दडलेल्या कलेला, कलाकाराला बाहेर येण्यास उद्युक्त करतात. तुमच्यातल्या कलेला अन् कलाकाराला फुलवतात , घडवतात. तुम्हास प्रसिद्ध करतात.

तेव्हा मित्रमैत्रीणींनो आपल्याला लाभलेलं हे आयुष्य आहे त्याहूनही आधिक सुंदर – सुखद बनवायचं असेल, भरभरुन जगायचं असेल तर आयुष्यात एक तरी छंद मनापासून जोपासाच. मग पहा तुमचं आयुष्य तुमचा भवताल तुम्हाला किती सुंदर दिसतो ते.

लेखाच्या सुरुवातीला वपुंनी जसं म्हटलय कि, हरवणं आणि सापडणं हे तेव्हाच घडेल जेव्हा तुम्ही एखादा छंद जोपासाल, त्या छंदांचा पिच्छा पुरवाल , छंदाची पूर्तता करता करता त्यात हरवून जाल त्याचवेळी तुमच्यात दडलेल्या एका छंदी व्यक्तिमत्वाचं दर्शन तुम्हाला घडेल आणि तुमच्या आत दडलेले तुम्ही , तुमच्या आत हरवलेले तुम्ही तुम्हालाच सापडाल अन् मग आपल्याला हवी असणारी गोष्ट सापडल्यानंतरचा अनुभव तुम्हाला ठाऊक असेलच. .

© चंदन विचारे
(सहज सुचलेलं अन् अनुभवलेलं)

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..