आज २७ फेब्रुवारी. ‘जागतिक मराठी भाषा दिवस’. याच दिवसाला`राजभाषा दिवस’ असंही म्हणतात. जेमतेम सात दिवसांपूर्वी, २१ फेब्रुवारीला `जागतिक मातृभाषा दिवस’ जगभरात साजरा केला गेला.
ह्या निमित्ताने श्री. पु. ल. देशपांडे यांच्या ‘पूर्वरंग’ या पुस्तकातला हा लहानसा उतारा..
“आपल्या देशात पाश्चात्यांची निष्प्राण नक्कल करण्यात आपण किती पुढे गेलोत हे पाहायचे असेल तर एखादे ‘भारतीय’ काॅर्पोरेट आॅफिस बघावे..किंवा एखाद्या ‘शेट्टी’ने चालवलेले उंची हाॅटेल पाहावे..आत येणारा इंग्रजी बोलणारा असला तर (तरच) त्याच्याकडे लक्ष द्यायचे असा तीथला नियम असतो..देशी भाषा अन् देशी कपड्यांना आपल्या देशात कवडीचीही किंमत नाही..गोरी कातडी दिसली की तळवे (चपलांसहीत) चाटतील..काळ्या रंगाचा द्वेष आपण करतो तीतका गोरेपण करत नसतील याची खात्री आहे..
मातृभाषा बोलायची कोणाला मरणाची लाज वाटत असेल, तर ती आपल्याच देशी (यात मराठी बहुसंख्येने व इतर प्रांतीय अपवादाने) लोकांना..!!आपल्या भाषेबद्दल, कपड्यांबद्ल लाज बाळगणे हेच आमचे सर्वात मोठे भूषण..!”
–पु. ल. देशपांडे.
किमान आजचा दिवस तरी आपापल्या मातृभाषेत बोला-लिहा. आजचा दिवस तरी तीचं स्मरण करा अन्यथा आपणच तिला श्रद्धाजली वाहाण्याची वेळ दूर नाही.
Leave a Reply