१ मार्च १९२२ रोजी स्थापन झालेली रत्नागिरी शहरातील फाटक हायस्कूल ही रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षण देणारी एक नाविन्यपूर्ण संस्था आहे. दि न्यू एज्युकेशन सोसायटी ही संस्था १९४० मध्ये स्थापन केली गेली असली तरी ही शाळा १९२२ पासून अस्तित्वात आहे.
फाटक हायस्कूल रत्नागिरीची स्थापना पुरुषोत्तम वासुदेव फाटक (फाटक गुरुजी) यांनी १ मार्च १९२२ रोजी केली. पुरुषोत्तम वासुदेव फाटक यांनी त्या काळच्या स्वदेशी शिक्षणाच्या लोकमान्यांच्या विचाराने भारून जाऊन,ब्रिटिशांची नोकरी सोडून शाळा सुरु केली.ही शाळा नावारूपाला आणण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. शाळेत मॅट्रिक पर्यंतचे वर्ग सुरु झाले. त्या काळी ही परीक्षा द्यायला मुंबई येथे जावं लागे. १९३९- १९४० त्यांच्या शाळेतील मध्ये पहिल्या बॅचने मॅट्रिकची परीक्षा दिली. त्या बॅचची मुलं मुंबईत जायला निघाली.आणि त्याच दिवशी फाटक गुरुजींचे रक्तातली साखर वाढल्याचं निमित्त होऊन निधन झाले. तो दिवस होता १ एप्रिल १९४०.
त्या वेळी ही रत्नागिरी गावात त्यावेळी चांगलं मूळ धरलेली एक शिक्षण संस्था होती. त्याच वेळी फाटक गुरुजींच्या पत्नी रुक्मिणी पुरुषोत्तम फाटक यांनी इतर बरोबरच्या शिक्षकांना घेऊन पुढे शाळा चालू ठेवली.फाटक गुरुजींच्याच्या सहका्यांनी शाळा चालवण्यास कसरही ठेवली नाही. त्यांच्या बरोबर सर्वश्री व्ही.एन्.आठवले,के.आर.लिमये,बी.आर.मावळंकर,डी.पी.मोडक,एन्.जी.नेने,एम्.व्ही.दामले हे अतिशय कार्यकुशल शिक्षक काम करीत होते.आता शाळेचं काय?हा प्रश्न होता.या वेळी तत्कालीन शिक्षणाधिकारी मा.वि.द.घाटे यांनी आता शाळेसाठी संस्था स्थापन करुन ती रजिस्टर करा,असा सल्ला दिला.आणि १९४० मध्ये दि न्यू एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली.त्याच वेळी फाटक गुरुजींच्या न्यू इंग्लीश स्कूल या शाळेचं ” फाटक हायस्कूल”असं नामकरण करण्यात आलं. या शिक्षकांपैकी लिमये मास्तर जगन्नाथ शंकरशेटचे मानकरी होते.तर मावळंकर सरांचं लिखाण त्यावेळी टाईम्स ऑफ इंडिया मध्ये छापून येत असे. तसेच रानडे, शारंगपाणी असेही अत्यंत विद्वान शिक्षक शाळेत कार्यरत होते. बा.रा.मावळंकर हे फाटक हायस्कूलचे सर्वाधिक काळ मुख्याध्यापक राहिले होते. स्वातंत्र्य लढ्याच्या काळात शिक्षण पध्दतीवर इंग्रजी छाप होती पण तरीही शाळा आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत होती. या धडपडीला मुख्याध्यापक ज.ग.भावे यांनी निश्चित दिशा देण्याचं काम केलं. प्रख्यात अर्थतज्ञ मो.वि.भाटवडेकर, कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्रतापराव साळवी, माजी खासदार बापूसाहेब परुळेकर,अशी उत्तुंग व्यक्तीमत्व फाटक हायस्कूलचे माजी विद्यार्थी आहेत.फाटक हायस्कूलच्या शतकपूर्तीच्या पार्श्वभूमीवर संस्थेने २०१६-१७ पासून इंग्रजी माध्यमाचा श्रीगणेशा केला. सध्या न्यू एज्युकेशन सोसायटी संस्थाचे प्ले स्कूल, एक बालवाडी, एक प्राथमिक शाळा, तीन माध्यमिक शाळा, मुक व कर्णबधिर मुलांसाठी एक विशेष शाळा आणि कला, वाणिज्य आणि विज्ञान प्रवाह असलेले कनिष्ठ महाविद्यालय कार्यरत आहे.
आज फाटक हायस्कूल शतकमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट/दाक्षायणी बोपर्डीकर.रत्नागिरी.
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
Leave a Reply