सांजाळलेल्या या सांजवेळी
सुंदर, शाममनोहारी लोचनी
घुमवित येता मंत्रमुग्ध पावरी
भुलूनीया सारे बावरते अवनी….
स्पंदनी अवीट, मधुर सुरावट
आत्मरंगी अनुपम येते उमलूनी
तो लाघवी, लडिवाळ सावळा
झरतो, हृदयी स्वरतालातुनी…..
भक्तीतुनी विर्घळता आसक्ती
मोहमाया सारी जाते वितळुनी
होता अगम्य साक्षात्कार ईश्वरी
चाहूल चैतन्याची चराचरातुनी…
शुचितसोज्वळी सुरम्य सुंदरम
ब्रह्मरूप हरिहराचे या नंदनवनी
महासागर कृपावंती स्वानंदाचा
निर्मोही त्यात जावे तृप्त डुंबूनी
-वि.ग.सातपुते.(भावकवी)
रचना क्र. १४८
३१/१०/२०२३
9766544908
Leave a Reply