सोन पावलीं घरी येणार पाहुणा नवा,
आतां येणार पाहुणा नवा,
बाई, येणार पाहुणा नवा ।
काय करु मी अन् कसे करु
काही मला, सुचेचि ना,
बाई काही मला, सुचेचि ना ।।धृ।।
किती दिसांचे स्वप्न मनींचे,
आंस मनींची, लई दिसांची ।
चिंता उगाच, होते खेळ मनाचे,
जाणीव झाली, मज भगवंताची ।।
घेऊनि घटिका आली सुरेलसा गोडवा ।।१।।
हवीत मजला, झणी चिंचा बोरे,
भरले अंगात, पिसाट वारे ।
गोड खाऊ किआंबट, कळेविना,
काय खावे हे मज उमजेविना ।।
चंचल मनींचा, सरला सारा रुसवा ।।२।।
डोहाळ्यांचे मनीं डोंब उसळले,
सारेचि मजसि पुसू लागले ।
मनीं संतोषाचे सजले इमले,
हृदयी संगीत बहरुनि आले ।।
घुमू लागला, अंतरी आनंदी पारवा ।।३।।
— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास
Leave a Reply