मराठी चित्रपटसृष्टीतील पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता चैतन्य ताम्हाणे यांचा जन्म दि. १ मार्च १९८७ रोजी मुंबई येथे झाला.
एक संवेदनशील दिग्दर्शक आणि सिनेनिर्माता म्हणून चैतन्य ताम्हाणे ओळखला जातो. त्यांनी मुंबईतील मिठाबाई कॉलेजमधून साहित्यामध्ये पदवी घेतली. त्यांची आई ह्या रेल्वेतील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत आणि वडील पर्यावरण विषयातील सल्लागार आहेत.
‘अॅकेडमी पारितोषिक’ विजेते चित्रपट निर्माते अल्फोन्सो क्वारन यांना दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे आपले गुरू मानतो.चैतन्य ताम्हाणे याचा २०१४ साली, कोर्ट हा मराठी भाषेतील चित्रपट प्रसिद्ध झाला. त्याच्या ‘कोर्ट’ या मराठी चित्रपटाला ‘सुवर्णकमळा’चा सर्वोच्च बहुमान मिळाला. न्यायव्यवस्थेतील त्रुटींवर प्रकाश टाकणाऱ्या या चित्रपटाचे देशविदेशातील अनेक महोत्सवांत कौतुक झाले. हा चित्रपट १७ एप्रिल २०१५ला प्रदर्शित झाला. राष्ट्रीय पुरस्कारावर मोहर उमटविणाऱ्या ‘कोर्ट’ या चित्रपटाने नंतर ‘ऑस्कर’ चा उंबरठा गाठला. ‘ऑस्कर’ पुरस्कारासाठी भारतातर्फे या चित्रपटाची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड करण्यात आली. ‘ऑस्कर’ च्या ‘बेस्ट फॉरेन फिल्म’ या विभागासाठी ‘कोर्ट’ निवडला गेला होता. या घटनेमुळे मायमराठीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. ‘कोर्ट’ या चित्रपटा नंतर ‘द डिसायपल’ हा चित्रपट बनवला.
तब्बल २० वर्षांनी व्हेनिस चित्रपट महोत्सवात स्थान मिळवणारा ‘द डिसायपल’ हा पहिला भारतीय सिनेमा ठरल्याने या सिनेमाची चांगलीच चर्चा रंगली होती. व्हेनिस चित्रपट महोत्सवात हा सिनेमा पहिल्यांदा प्रदर्शित करण्यात आल्यानंतर अनेक आंतरराष्ट्रीय समीक्षकांकडून या सिनेमाचं कौतुक करण्यात आलं. त्यानंतर टोरंटो चित्रपट मोहत्सवातही या सिनेमाने अनेकांना भुरळ घातली.
या सिनेमासाठी चैतन्य ताम्हणे यांनी पाच वर्षे मेहनत घेतली. यासाठी त्यांनी देशभर प्रवास केला . शास्त्रीय संगीतातील अनेक संगीतकार आणि जाणकारांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधून शास्त्रीय संगीताचा खोलवर अभ्यास केला. व्हेनिस हा जगातल्या तीन महत्त्वाच्या चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. तिथे प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची जगभर चर्चा होते. शास्त्रीय संगीत आणि त्याचं जग यावर हा चित्रपट आधारीत आहेत. यात सुमित्रा भावे, आदित्य मोडक, सुमित द्रविड आणि किरण यज्ञोपवीत यांच्या भूमिका आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply