चैत्र वर्ष दाराशी आले,
डोकावुनी ते मला म्हणाले,
वर्तमान मी आहे तुमचा,
झाले गेले गंगेस मिळाले.
नवे वर्ष अन् नव्या कल्पना,
घेऊन क्षितिजावर अवतरू पुन्हा.
विसरुनी सरत्या ‘काळां ‘ आपण,
होऊ सज्ज, समजावू मना.
नवे वर्ष, उमेद नवी ती,
ठाम निश्चया घेऊनी सोबती,
लाभेल उभारी पुन्हा एकदा,
स्वप्ने फुलतील पुन्हा सभोवती.
लिहित रहा, वाचीत रहा तू
शब्दांचे बांधीत जा तू सेतू,
नवी प्रतिभा, नव्याच कविता,
तुमच्या वाह! वर मी राहीन लिहिता,
तुमच्या वाह! वर मी राहीन लिहिता,
नवे मराठी वर्ष आणि गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा!
प्रासादिक म्हणे,
— प्रसाद कुळकर्णी.
Leave a Reply