एक गहनिय विचार,हा विषयच तसा आहे.ज्यावर सर्व स्तरातून प्रबोधनाची निकड भासतेय.
हा प्रश्न म्हणजेच ,”आजची तरुण पिढी आणि व्सनाधिनता.”
भारतीय अनमोल संपत्ती ,असा उल्लेख करावा ; अशी भारतातील युवा पिढी व्सनाच्या एका वेगळ्याच विश्वात रममाण झालेली आहे.व्सन आणि त्याचे होणारे दुष्परिणामांची जाणीव असूनही,युवावर्ग त्यापासून परावृत्त होताना दिसत नाही.
देशाच्या उज्वल भविष्याचा दोर नेहमीच युवापाढीच्याच हातात ो भावना,कुसंगत,पालकांचा दुर्मिळ सहवास,कौटुंबिक कलह अशा अनेक प्रश्नांपासून अवलंबिलेला पलायनवाद म्हणजे व्यसन असेही म्हणावयास हरकत नाही.
आज सुशिक्षित,अशिक्षित,गरीब एवढेच नाही तर उच्चभ्रु समजला जाणाऱ्या प्रतिष्ठीत समाजातिल मुलेच नाही। तर मुलीसुद्धा या चक्रव्युहात अडकलेल्या दिसतात.चक्रव्युहात जेवढ्या पटकन ही पिढी प्रविष्ट होते,तेवढ्याच तत्परतेनं ह्यांना भेद करुन बाहेर येता येत नाही.अभिमन्यू एकटाच अडकला,इथे मात्र सारेच अडकताहेत.
ज्या प्रमाणे एखादं चक्रीवादळ किंवा त्सुनामी आपल्या बरोबर सगळ्यांना विनाशाकडे घेऊन जाते;तद्वतच आजची पिढी व्यसन नावाच्या चक्रीवादळात पार गुरफटलेली दिसून येते.आजची युवा पिढी स्वत:च स्वत:ला मृत्यूच्या दाढेत ढकलतांना दिसत आहे.
व्यसन हे चरस,अफू,गांजा,दारू,बिडी,सिगारेट,झोपेच्या गोळ्या,बिडी अशा मादक पदार्थांचे असू शकते. नशेच्या आहारी गेलेली व्यक्ती स्वत: बरोबरच कुटुंब, समाज पर्यायाने राष्ट्राला विनाशाच्या गरर्तेत ढकलत असते.खेदाची गोष्ट अशी आहे की,यात तरूण वर्ग विशेषत्वाने प्रभावित झाला आहे.
व्यसनाच्या चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी प्रबोधनाची विशेष आवश्यक्ता आहे.व्यक्तिगत पातळी बरोबरच सामाजिक व शासकीय स्तरावर चळवळ होणे नितांत गरजेचे आहे.
तरूण पिढी ही आपल्या राष्ट्राची मौल्यवान पिढी आहे. ३१ डिसेंबर, १ जानेवारी, वाढदिवस, सार्वजनिक उत्सव, लग्नसमारंभ अशा आनंदोत्सवात दारूने चांगलाच जम बसवलेला दिसून येतो.
वरील प्रत्येक मुद्याला अपवाद असणारच.तरीही ,”आजची युवा पिढी आणि व्यसनाधिनता”,हा आपल्यापुढील सतत भेडासणारा प्रश्न आहे ;हे नाकारून चालणार नाही.
आशावाद हा माणसाला यशस्वितेकडेच नेतो.आपण आशा करूया आजचा तरूण निश्चितच यातून बाहेर पडेल .
— सौ. माणिक शुरजोशी
नाशिक
Leave a Reply