चल, चांदण्यांची सैर करू,
अंबरी, ढगां-ढगांत विहरू,
कडेकडेने मेघांच्या,जाऊ,
हळूच,मऊ मऊ दुलईत शिरू,-!!
मिचकावून डोळे आपुले,
चांदण्यांची वरातच पाहू,
सुंदर चमचमत्या प्रकाशात,
त्यांची आभा नीट न्याहाळू,–!!
काळ्याशार गालिच्यावर नभांत,
वावरते प्रकाश–झोत पाहू,
इकडून तिकडे हलत्या प्रवासी,
चंद्राचीही धांदल बघू,—!!
कोण त्यांच्यात अधिक सुंदर,
मनी मानसी स्पर्धाच लावू,
चंद्राचा मुखडा लोभसवाणा,
पाहून आपण अचंबित होऊ,–!!
धरेवर ती मजा नाही,
ना कुठली दिसे चांदणी,
नकली नको त्या, असली पाहू,
देखणी, नाजूक त्यांची बांधणी,–!!
पृथेवर का कधी चंद्र दिसे,
तोही इतुका जवळून आढळे,-?
थंडगार त्या वातावरणी,
झोपण्यात केवढी मजा असे,-?
अंतराळाचे सुख निराळे,
दु:खाची मुळी बात नसे,
ताण-तणांवा नसेल जागा,
ताणून द्या हो,शरीर सगळे,–!!
ओढाताण नाही कुठली,
जिवां मिळेल विश्रांती,
मानापमानाची कल्पनाही,
तिथे करायाची नाही,–!!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply