चल सये ग झणीं,
मांडू या खेळ अंगणी,
लहान वयातली भातुकली,
धांदल बाहुलीच्या लग्नाची,–!!!
लग्न करण्या त्यांचे,
घालत होतो घाट,
धावपळ करत सगळी,
मांडायचा सर्व थाट,—-!!!!
इवले इवले बाहुला बाहुली,
सुंदर गोंडस खूप छोटुकली,
मुंडावळ्या बांधून त्यांना,
उभे सगे घेऊनी हाती,–!!!
सासर माहेर सगळे मिळुनी,
अंगण जायचे गजबजुनी,
ठुमकत येई वरमाई,
नाकात झोकात नथ घालुनी,–!!!
देण्याघेण्यावरून गोष्टी,—
मात्र सगळ्या फिस्कटती,
सासरकडच्या आयाबाया,
एकदम सगळ्या रुसून’ बसती, –!!
मग आजोबा मोठे ,
उगा मध्यस्थी करती,–!!!
सनई चौघडा घेऊन उभे
त्यांना कशा “खुणा” करिती,–!!!
बाहुल्या’च्या घरचे सांगती,;—
सासरकडची इटुकली पिटुकली,
म्हणती मिळेल का असा जावई,-?जरा जास्तच फणकारुनी,–!!!!
मग तोडगा मधे निघे,
आई आजी म्हणतील तसे ,
पुसावया” जाती, -सगळे,
वधू-वर’ पण, इकडे एकटे,–!!!!
पाहून त्यांना हळूच असे,
मोठे आजोबा युक्ती करिती, एकत्र आणून दोघांनाही,–!!!
लग्न लावून मोकळे होती,–!!!
आज आठवते सयी,”
त्या प्रसंगाची लगीन -घाई
असे लग्न लावण्या पण,—
कुणी आजोबा उरला नाही,–!!
हिमगौरी कर्वे.
Leave a Reply