लहान मुलं खेळताना स्वतःला कुणाच्या तरी भूमिकेत जावून ते उत्तम प्रकारे निभावतात. निरिक्षण केले तर कौतुक वाटते. पूर्वी मुले चालक म्हणजे ड्रायव्हर. शिक्षक. किंवा डॉक्टर आणि पोलीस यांची भूमिका अगदी छान वठवत असत. आता कसले कसले मॅन होतात. चालक सरकारी. खाजगी असतात. खर तर ऑटो चालवणारे चालकच असतात पण त्यांना ड्रायव्हर म्हणत नाहीत.
कधीही कुठेही जायचे झाले की बस मधून जावे लागत असे. तिकीट काढून सगळे जागेवर बसले आणि खात्री करून वाहक दोरी ओढून चला असा संकेत देतात. प्रवासी आपापल्या परीने जेवण. झोप. गप्पा. वाचन. आणि आता मोबाईल फोन वगैरे मध्ये गुंगतात. पण त्याला मात्र एकाच जागी बसून लक्ष केंद्रित करुन अगदी जागरूक पणे जबाबदारी पार पाडावी लागते. आपल्या इच्छित स्थळी प्रवासी उतरतात चढतात. त्यामुळे इथेही तो जागरूक असतो. एखाद्या ठिकाणी लोकांच्या सोयीसाठी थोडा वेळ जास्त थांबावे लागते. सगळे जेवणखाण. चहा नाष्टा करतात पण याला यावर संयम ठेवावा लागतो. घरचे फार कमी वेळा मिळते. कधी कधी रात्रीचा प्रवास असतो तेंव्हा तर खूपच संयम ठेवायला लागतो. झोप येऊ नये म्हणून एक सारखे चहा. तंबाखू याचा वापर जास्त करतात. लांब पल्ल्याच्या गाडय़ा गेल्यावर तिथे त्याला थोडा आराम मिळतो. झोप काढावी लागते. परत सकाळी लवकर उरकून प्रवास सुरू करावा लागतो…
सणानिमित्त ज्यादा गाड्या सुटतात. आपण सगळे आनंदात असतो. नातेवाईकाकडे जाण्याची ओढ असते. पण यांना आपलेच घर सोडून सणवार बस मध्येच साजरे करावे लागतात. घरातील लोकांना. मुलांना घेऊन बाजारात खरेदी करणे हे होत नाही. अशा वेळी आपण कधी आपल्या जवळचा फराळ. जेवण त्याला देतो का? एखाद्या ठिकाणी खरेदी करतांना साडी. कपडे. किंवा खाऊ घेऊन त्याला देतो का?त्याला घरच्या लोकांना घेऊन बाजारात जाता येत नाही पण आपल्या छोट्याश्या भेटीतून त्याचे संपूर्ण कुटुंब किती आंनदात सण साजरा करतील याचा विचार केला पाहिजे. आता बरेच लोक खाजगी वाहन करून प्रवास करतात. तेव्हाही असेच होत नाही. एवढेच नव्हे तर ज्यांच्या घरी जातो तिथेही त्याला चहा. जेवण. अंघोळ. झोप वगैरे वाहन सांभाळतच बाहेरच्या आवारातच करावे लागते. कधी कधी एखादेच आपल्या घरात बोलावून त्याच्या चहा. नाष्टा. जेवण याची सोय करतात. त्याची विचारपूस करतात. देवदर्शन. निसर्ग रम्य ठिकाण काहीही पहात नाही. त्याच्या वर वाहनाची जबाबदारी असते.खरेदी तर दूरच. आपल्या लोकांच्यात आपण रमतो. त्याला एकट्याला बसून रहावे लागते. म्हणून वाईट वाटते पण काय करणार ज्याचा त्याचा व्यवसाय आहे म्हणून नियमानुसार वागावे लागते. शेवटी तो देखील एक माणूस आहे.हे लक्षात ठेवावे एवढेच वाटते…
काही भागात चालकाला खूपच अवघड. अरूंद. वळण वळण असलेल्या वाटेने जावे लागते. वाटेत अनेक अडचणी येतात. संकटं येतात. पण त्याला जाणीव आहे की तो अनेकांचा प्राणदाता आहे. चूक होता कामा नये. आपण सगळे हुश्श करून मोकळे होतो. दुसऱ्या दिवशी अंग दुखते. त्रास होतो म्हणून आराम करतो पण त्याला लगेच कामावर हजर रहावे लागते. परदु:ख शितल.
धन्यवाद.
— सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply