चाळीशीच्या उंबऱ्यावर,
पुन्हा नवथर होऊ थोडे,
जग सारे विसरुन आपण,
एकरुपतेची पाहू स्वप्ने,
तुझ्यात मी अन् माझ्यात तूही,
विरघळून जाऊ रे असे,
दुग्धशर्करा होऊनी जीवन,
पुन्हा एकदा जगू तसे,
तू माझी छाया आणि
मी तुझी अशी सावली,
छायेने सावली व्यापते,
सावलीच छायेच्या हृदयी,–!!!
हिमगौरी कर्वे
Leave a Reply