चांदण्याना पण साथ
हवी असते चंद्राची,
सरिता अंतिम सागरात
हळुवार विलीन होते.
मग स्त्रीला पण हवी
असते गरज पुरुषाची..
अपूर्ण आहे दोघे एकमेकांशिवाय,
खरं स्त्रीत्वाचे अनेक नाजूक
पैलू पुरुषाला खुणावतात..
मग स्त्रीला पण खुणावत असतात
पुरुषातील पुरुष सौंदर्य असतं, ते म्हणजे
पुरुष जिगर, हिम्मत, पुरुष बाणा!
अनादीअनंत काला पासून हे
चक्र चालू आहे…
ह्या भाव विभोरातून तो निलवर्णी सावळा
कृष्ण पण सुटला नाही ..
तर मग आपल्या सारख्या
सामान्य लोकांनी ह्या विभोरात
फक्त झोकून द्यायचं…
ह्या जाणिवेत गुंतून जातो पुरुष,
आणि स्त्री पण गुंतून जाते..
भावना आणि मन नाजूक
झालं की जाणिवा बद्ध होतात,
गुंतलेल्या भावनांना सोडणं
की धरण हे भाव विभोरावर असतं..
पण सत्य हेच की गुंतल जातं
त्याला मन म्हणतात..
आणि भावना उत्कट होतात
तेव्हा मन एकमेकांत जुळतात..
स्त्री आणि पुरुष एकमेकांशिवाय
अपूर्ण हे सत्य अंतिम ठरतं…
मग त्या उत्कट भावनेत वाटा
गंधाळल्या तर दोघेही बरोबर
किंवा दोघेही चूक…
एक भाव आणि एक मन
ह्यांच हितगूज म्हणजे एक
स्त्री मन आणि एक पुरुष भाव
यांचं उत्कट गंधित मनोमिलन..
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply