सरांच्या ओळखीने चंदरला एका डॉक्टरकडे काम करण्याची संधी मिळाली .रोज चार तास काम करावे लागेल “, या अटीवर चंदर या कामावर हजर झाला . आल्या-गेल्याची नोंद ठेवणे , पेशंटची नोंद ठेवणे , त्यांची बिले तयार करणे”, अशा स्वरूपाचे काम “,हे जास्त जिकीरीचे काम नाही या नव्या कामातून जे पैसे मिळतील त्यातून तुझा इतर खर्च भागू शकेल “, गुरुजींची हे सांगणे.
चंदरला योग्य वाटून गेले..
रोज ठरलेल्या वेळेत येऊन चंदर काम करू लागला . काही दिवस गेल्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या कडून इतरही कामे करून
घेण्यास सुरुवात केली . तसे तर त्यांच्या दवाखान्यात अनेक नोकर होते , त्यातून एखादा गैरहजर राहिला तर त्यादिवशी त्याचे काम चंदरला करावे लागत असे.
मात्र या जादा कामाच्या बदल्यात एक ही पैसा मिळत नव्हता. या दवाखान्यात येणारे सगळे पेशंट श्रीमंत होते . काहीही झालेले नसतांना काल्पनिक आजाराने हे श्रीमंत लोक दवाखान्यात दाखल होत असायचे .
“पैश्याच्या जोरावर वाट्टेल तशी कामे करून घेतांना, या लोकांना काही वाटत नसायचे. अशा लोकांच्या पलंगावरच्या चादरी बदलणे, खोली साफसुफ करणे ” ही कामे डॉक्टर चंदरला सांगत असायचे .
कॉलेजमधून निघण्यास उशीर झाला की दवाखान्यात येण्यास उशीर होते असे, त्यावेळी सगळ्या लोकांच्या समोर डॉक्टर चंदरला वाट्टेल तसे बोलायचे.
कधीकधी त्याला वाटायचे, द्यावं हे काम सोडून, जसं होईल तसं पाहून घेऊ , पण पैशाची अडचण आल्यावर आपले कसे होईल ? या एका विचाराने चंदरला नोकरी सोडता येत नव्हती.
एके दिवशी बापू आणि गिरीजा चंदरकडे आले. बापू म्हणाला – गावाकडं लई दवा-पाणी केल , काय बी फरक पडना, आता तुज्या डॉक्टरला दाखवू , इलाज करू , तवाच , तुज्या आईचं दुखणे कमी होईल बघ !
आईची अवस्था पाहून चंदरचे मन गलबलून गेले . आपण मोठे व्हावे म्हणून आईने किती कष्ट करावे ? शेवटी आजारी पडली, तरी मेहनत करण्यासाठी , तिचे मन तयार आहे , पण आता थकलेल शरीर मात्र साथ देत नव्हतं .
बापूला आणि आईला घेऊन चंदर दवाखान्यात आला , आईच्या आजाराबद्दल त्याने डॉक्टरांना सांगितले , म्हणाला – सर, तुम्ही उपचार केले तर , माझी आई नक्की बरी होईल.
त्याचे ऐकून घेतल्यावर डॉक्टर म्हणाले – ” हे बघ चंदर, माझा दवाखाना म्हणजे धर्मशाळा वाटली की काय तुला ? असे फुकटचे पेशंट घेत बसलो तर माझे दिवाळे वाजेल. तू तुझ्या आईला एखाद्या धर्मदाय हॉस्पिटल मध्ये दाखव , तिथे होईल सगळा फुकट इलाज. !
अहो ,डॉक्टर , मी तुमच्याकडे काम करतोय, त्यापोटी तरी काही करा ! अगदी कळवळून चंदर त्यांच्या बोलला .
त्यावर डॉक्टर म्हणाले – “मग काय झालं ?, काम करतो म्हणे , फुकट नाही करीत तू काम ,मी पैसे देतो त्या कामाचे . तू जा आता , माझा वेळ घेऊ नकोस, माझे पेशन्ट तपासू दे मला.
या डॉक्टरनी आपल्या पोराला इतकं टाकून बोलाव !’ ऐकूनच बापू आणि गिरिजेला वाईट वाटलं , आपला चंदर – गरीब स्वभावाचा आहे , म्हणून काय , त्याच्याशी असे वागाव का ? काही न बोलता – तिघे ही त्या दवाखान्याच्या बाहेर पडले .
पैश्याच्या धुंदीत या डॉक्टरला माणुसकीचा विसर पडलाय. अशा माणसाकडे राहून आपले “श्रम व्यर्थ खर्च का करायचे ? आता पुन्हा या दवाखान्याची पायरी चढणे नाही “, असे चंदरने ठरवले.
दुसर्या दिवशी चंदरच्या सरांना हे सारी हकीकत कळाली. त्यांनाही डॉक्टरांच्या अशा वागण्याने दुखः झाले. ते म्हणाले –
चंदर , आता चांगले वाटेपर्यंत तुझी आई इथेच राहील. तू काळजी करू नकोस . हा एक डॉक्टर असा वाईट वागला, म्हणून , इतर असेच आहेत “, असे मात्र नाही.
अरे “, समाजाचे भले झाले पाहिजे “, या भावनेने काम करणार्यांनी हे जग भरलेले आहे. अशी पण माणसे आहेत ” , म्हणून तर हे जग व्यवस्थित चालले आहे .” सरांच्या या शब्दांनी चंदरच्या दुखावलेल्या मनावर सरांनी जणू फुंकर घातली होती. नंतर एका संस्थेच्या दवाखान्यात गिरीजेच्या आजारावर उपचार झाले . दोन महिने दवाखान्यात राहून गिरीजा चांगली बरी झाली . काही दिवसांनी मोठ्या समाधानाने बापू आणि गिरीजा वाडीला परत गेली.
आईच्या आजारपणात तिच्याकडे लक्ष देण्या मुळे अभ्यासाकडे नाही म्हटले तरी दुर्लक्ष झाले होते . त्याची कसर आता भरपूर अभ्यास करूनच भरून काढावी लागणार होती.
चंदरने अभ्यासाला सुरुवात केली . रात्रीची जागरणे सुरु झाली, अभ्यास करतांना त्याला वाटायचे – गरीबाच्या वाट्याला हे दुखः देणारे भोग का येत असावे ?
माझ्यासारखे अजून कितीतरी जण या जगात आहेत , बिचार्यांना राहायला जागा नाही ,खायला अन्न नाही तरी ही मुले उपाशी पोटी राहून सुद्धा मोठ्या जिद्दीने शिकत आहेत. “जगण्यासाठी माणसाला फक्त पैसाच लागतो का ? मनाला निराश करणाऱ्या अशा प्रश्नांना झटकून टाकीत चंदर अभ्यास करीत होता.असे करीतच परीक्षा आली, आणि झाली सुद्धा
परीक्षा देऊन चंदर आता गावाकडे आलेला होता .गुरुजींना भेटण्यासाठी चंदर त्यांच्या घरी आला , दोघे बोलत बसले ..तेंव्हा चंदर म्हणाला – ” गुरुजी , चांगले जगता येण्यासाठी माणसाला फक्त पैसाच आवश्यक असतो का हो ? त्याच्या जवळ भरपूर पैसा असला तर , त्याला कशाचीच गरज पडत नाही का ?
त्याच्या या प्रश्नाचे उत्तर देतांना गुरुजी म्हणाले – चंदर , शहरात राहून तुझ्या मनाचा पक्का समज झालेला दिसतो आहे की , “पैसा म्हणजेच जीवनाचे सर्वस्व आहे ” , तुझा हा समज फार चुकीचा आहे. जीवनाचे खरे अनुभव अजून तुझ्या वाट्याला यायचे आहेत . तुला सांगतो चंदर .. “समाधान नावाची गोष्ट ज्याच्याजवळ आहे “, तो खरा सुखी असतो. एखाद्या जवळ गडगंज संपती आहे. खाण्या-पिण्याची कमी नाही, सेवा करण्या साठी नोकर -चाकर आहेत “, हे सगळ असून “मनाला समाधान नाही , शांती नाही .अशा माणसाच्या जगण्याला काही अर्थ आहे का ?
“शांत झोप लागत नाही “, म्हणून ही माणसे मखमलीच्या गाडीवर सुद्धा बेचैन होऊन देवाची पार्थना करतात,की “देवा मला सुखाची झोप लागू दे..!
चंदर ,अशावेळी या श्रीमंत माणसांना आपल्या सारख्या गरीबांचा हेवा वाटत असतो”, हे तुला खरे वाटणार नाही.
हे बघ, आपल्याला उद्याची चिंता नसते , “आजचा दिवस पार पडला “, या समाधानात आपल्याला गाढ झोप लागत असते , आणि ” हेच सुख पैसेवाल्यांच्या नशिबी नसते “, म्हणून हे आयुष्भर दुखी असतात. अरे , किंमती दागिने , काय उपयोगाचे ?
माणुसकी , दुसऱ्या विषयी आपल्या मनात असणारे प्रेम , वाटणारी करुणा , त्याग करण्याची भावना “, हेच आपले खरे दागिने समजावेत. यामुळे तर माणूस खरा श्रीमंत बनतो., या वैभवात कधी कमी येत नाही. दुसऱ्यासाठी जगण्यात काय आनंद असतो ? हे कळण्यासाठी स्वतहाचे जगणे विसरावे लागत असते .
चंदर – एक लक्षात ठेव , खोट्या रुपाला कधी भुलू नये, आपल्या मनाचा संयम ढळू देऊ नये, तू असे वागल्यास तुझ्या मनाची द्विधा अवस्था होणार नाही. “आपले जीवन म्हणजे सुख-दुखांचा, -उनपावसाचा खेळ आहे ” ….