भाग – ९ वा
———–
बारावीच्या निकालानंतर चंदरचे कॉलेज सुरु झाले. शाळेच्या कामानिमित्ताने गुरुजी शहरात आले ,तेंव्हा चंदरचे कॉलेज त्यांनी पाहिले.
चंदर म्हणाला – ” गुरुजी , हे शिकणे आपल्याला परवडणारे नाही. पुढचा सारा खर्च कसा झेपणार ?
त्याच्या प्रश्नाला उत्तर देत गुरुजी म्हणाले –
चंदर , प्रश्न खरोखरच अवघड आहे. ज्यांची पात्रता नसते “, ते पैशाच्या जोरावर शिकून मोठे होतात . गरीब विद्यार्थी मात्र त्याच्या अंगात
असलेल्या गुणवत्तेवर सुद्धा केवळ पैशाच्या अभावी काही करू शकत नाही. “हे कटू सत्य आहे.
पदवी शिक्षणासाठी आता सुरुवात होणार होती. रावसाहेबांच्या ओळखी मुळे एका संस्थेच्या मोफत वसतिगृहात चंदरच्या रहाण्याची सोय होऊ शकली .
त्यानंतर चंदरने वकीलसाहेबांचे घर सोडले . चंदरला निरोप देतांना बाईसाहेब म्हणाल्या –
चंदर – तुला आम्ही ओळखू शकलो नाही. सामन्य नोकरासारखं राबवून घेतलं , चार-चौघांच्या समोर तुझा अपमानही झाला , पण तू कधीच आम्हाला
उलट उत्तर दिले नाहीस. तुझं मन एवढं मोठं कसं ?
यावर चंदर म्हणाला –
” बाईसाहेब , गरिबी सगळं शहाणपण शिकवते माणसाला , तुम्ही मला आश्रय दिला, माझ्या पोटात चार घास गेले , ते तुम्ही खाण्यास दिल्यामुळे,
मला मिळालेले हे यश म्हणजे तुमचे आशीर्वाद आहेत . ” या घरातील माणसांचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही. “
चंदरला निरोप देतांना त्याघरातील सर्वांची मने भरून आली. ” सहवास घडला की या सहवासानेच माणूस ओळखता येतो हे खोटे नाही “.
गुरुजींच्या सुचनेप्रमाणे चंदरने विज्ञान- शाखेला प्रवेश घेतला. चंदर वसतिगृहात रहायला आला . शेकडो मुले रहात असलेल्या त्या गर्दीत चंदर
सहजपणे मिसळून गेला. नाना -स्वभावाची मुले तिथे होती.
सारी मुले गरीब घरातलीच होती. खेड्यातून आलेली ही मुले “शिकून मोठे होण्याची स्वप्ने पहात होती
“शहरातले वातावरण मनाला भुरळ घालणारे असते, मन भरकटून जाण्यास कोणते ही निमित्त पुरते , अशावेळी मन ताब्यात
ठेवण्यास फार कठीण जाते. अशा या वातावरणात अनेक मुले अभ्यास सोडून इतर गोष्टीत रमत असायची.
नव्या मित्रांच्या सहवासात चंदरचे नेवे जीवन सुरु झाले. या मुलांच्या बरोबर जुळवून घेतांना अनेकदा त्याला त्रास होत असायचा. या मुलांच्या
सोबत रहायचे म्हणजे त्यांच्या म्हणायाप्रमाणे वागावे लागे , नाही वागले तर , मग , पोरं त्रास द्यायची. खाण्या-पिण्यात दिवस घालवणे , अभ्यास सोडून
सिनेमा पहाणे , चकाट्या पिटत बसने , असले उद्योग आपल्याला परवडणारे नाहीत ” , हे चंदर ला जाणवत होते.यातून ही तो अभ्यासाला बसलाच तर ,
हे पोरं मध्ये मध्ये येऊन त्याला अभ्यास करू देत नव्हती.
” हा त्रास कुणाला सांगायची भीती होती. आणि वसतिगृह सोडून दुसरीकडे जाण्याची सोय नव्हती.त्यामुळे आहे त्या परिस्थितीत कसेतरी रहावेच
लागणार आहे ” , हे चंदरला कळून चुकले होते.
कॉलेजमध्ये वर्गात शिकवतांना- अनेक सरांच्या नजरेने –
हुशार चंदरला बरोबर टिपले होते.अनेकवेळा सरांचे मार्गदर्शन मिळू लागले . कधीकधी तो सरांच्या बरोबर अभ्यासा बद्दल चर्चा करू लागला होता.
हुशार चंदरला बरोबर टिपले होते.अनेकवेळा सरांचे मार्गदर्शन मिळू लागले . कधीकधी तो सरांच्या बरोबर अभ्यासा बद्दल चर्चा करू लागला होता.
” एक बुद्धिमान विद्यार्थी “, म्हणून चंदरला सारे कॉलेज ओळखू लागले. त्यातच वसतिगृहाचे प्रमुख असलेल्या सरांच्या कानावर “
टारगट मुले चंदरला त्रास देत असतात ” या गोष्टी आल्या .
, या नंतर सरांनी स्वतहाच्या बंगल्याच्या बाजूला असलेली एक रिकामी खोली चंदरला राहण्यास दिली. चंदरच्या मागचा सारा त्रास
आता संपला होता. या खोलीवर वर्गात शिकवलेल्या अभ्यासाची उजळणी करतांना कुणाचा त्रास होणार नव्हता ..
होळीच्या दिवशी “,वसतिगृहातील मुलांनी गावात जाऊन गोंधळ घातला”, या प्रकारात चंदरचा सहभाग नव्हता , परंतु सगळ्या मुलांच्या बरोबर त्याचेही
नाव प्राचार्यापर्यंत गेले. शिस्त-भंग केल्याबद्दल या मुलांना शिक्षा होणार “, अशी चर्चा सुरु झाली. अपराध न करता चंदरलाही शिक्षा होणार आहे ” ,
हे कळाल्यावर वसतिगृहाचे सर “, प्राचार्यांना भेटून म्हणाले -,
हे कळाल्यावर वसतिगृहाचे सर “, प्राचार्यांना भेटून म्हणाले -,
सर, चंदरचा या प्रकारात सहभाग नाही. त्याचे नाव विनाकारण सर्व मुलांच्या बरोबर यात आलेले आहे. या हुशार मुलाला आपण शिक्षा करू नये “, अशी
विनंती मी आपल्याला करतो आहे.
सरांच्या या विनंतीचा विचार करून प्राचार्यांनी चंदरला शिक्षेतून वगळले. या प्रसंगामुळे वसतिगृहाचे – सर ,आणि चंदर एकमेकांच्या खूप जवळ आले .
एकदा असेच बोलत असतांना चंदर म्हणाला –
सर, या प्रकारातून तुम्हाला माझ्या बद्दल काय वाटले ?
सर सांगू लागले –
” चंदर , तू आज ज्या परिस्थितीचा सामना करतो आहेस, मी देखील या मधून गेलेलो आहे. वाट्याला आलेली गरिबी आणि गरीब स्वभावा मुळे” मला नेहमी
त्रास सहन करावा लागला . अशा ही परिस्थितीत मी माझे धैर्य मात्र कधीच खचू दिले नाही . प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढण्यात आपले कौशल्य पणाला
लागत असते हे मला शिकण्यास मिळाले.
चंदर , मी देखील तुझ्यासारखाच गरीब घरातला . आई-बापांनी पोटाला चिमटा घेऊन मला शिकवलं “, माझ्यासाठी त्यांनी किती आणि काय सहन केलेय “,
याची जाणीव माझ्या मनात कायम आहे.
चंदर – या अफाट दुनियेत मी एकच शिकलो , प्रत्येकाशी माणुसकीने वागायचे . जाती-पातीचे खूळ माझ्या डोक्यात कधी शिरले नाही.
माझ्या गुरुजींनी मला शिकवला तो माणुसकीचा धर्म , जातीच्या भिंती कधीच उभ्या राहिल्या नाहीत.
मला जो भेटला , त्याला मी फक्त माणूस मानला , तो कोण आहे ?, हे विचारीत नाही.
चंदर – माणसाने माणुसकी हा धर्म मानला पाहिजे , बंधू भावना , एकोप्याची जाणीव ” या गोष्टीच मानवाच्या उध्दार करणाऱ्या आहेत “,
“आपल्या जवळ जे देण्या सारखे आहे ” , ते आपण मोकळ्या मनाने दुसऱ्याला देण्यात फार आनंद असतो. “जगाला प्रेम अर्पावे ” , सानेगुरुजींची ही शिकवण
मी आयुष्भर जपत रहाणार आहे.
“आपल्या जीवाचे कान करून सरांचा एकेक शब्द ” आपल्या मनात साठवून ठेवावा, असे चंदरला वाटत होते. ” खोटे मुखवटे लावून जगणाऱ्या लोकांच्या गराड्यात
सरांसारखे सच्च्या भावनेने जगणारे अनेकजण असतील , अशा माणसांच्या जगण्याला खरा अर्थ आहे
चंदरच्या विचारांना एक नवी दिशा देण्याचे काम सरांनी केले होते, सभोवतालचे गढूळ वातावरण पाहून मनाला मरगळ येते , जीवन निराशामय वाटते, पण ,
सरांसारखे व्यक्तिमत्व भेटते , त्यावेळी सारी निराशा झटक्यात दूर जाते आणि “जीवनात खूप चांगले आहे “- या आशेने जगण्याला नवीन उत्साह येतो.
कॉलेजचे पहिले वर्ष पाहता -पाहता संपले, अभ्यासात बुडालेल्या चंदरला सरांनी त्याचा दाखवला, सर्व विषयात “प्रथम-श्रेणीचे गुण “,मिळालेले पाहून चंदर ला समाधान वाटले. आता कॉलेजात चंदर चे नाव दुमदुमत होते. सर्व सरांच्या नजरेत चंदर चे स्थान आता फार उंचावले होते.
(क्रमश:)
— अरुण वि.देशपांडे
मो- 9850177342
Leave a Reply